सेंद्रिय तांदूळ दिल्लीच्या मेळाव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 11:42 PM2018-03-16T23:42:10+5:302018-03-16T23:42:10+5:30

राजधानी दिल्लीत शुक्रवार दि.१६ पासून आयोजित तीन दिवसीय कृषी उन्नती मेळाव्यात विविध कृषी उत्पादनांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. त्यात गडचिरोलीतील ३० शेतकऱ्यांना आपला सेंद्रिय तांदळाचा स्टॉल लावून त्या तांदळाची विक्री करण्याची संधी मिळाली आहे.

Organic Rice in Delhi Meet | सेंद्रिय तांदूळ दिल्लीच्या मेळाव्यात

सेंद्रिय तांदूळ दिल्लीच्या मेळाव्यात

Next
ठळक मुद्देतीन दिवसीय प्रदर्शन सुरू : जिल्ह्यातील ३० शेतकऱ्यांना संधी

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : राजधानी दिल्लीत शुक्रवार दि.१६ पासून आयोजित तीन दिवसीय कृषी उन्नती मेळाव्यात विविध कृषी उत्पादनांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. त्यात गडचिरोलीतील ३० शेतकऱ्यांना आपला सेंद्रिय तांदळाचा स्टॉल लावून त्या तांदळाची विक्री करण्याची संधी मिळाली आहे.
केंद्रीय कृषी विभागाच्या वतीने भारतीय कृषी संशोधन संस्था, न्यू पुसा, दिल्ली येथे या मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यात सहभागी होण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमधील ३० निवडक शेतकरी ५ क्विंटल तांदूळ घेऊन दिल्लीत दाखल झाले. कृषी विभागाच्या ‘आत्मा’ प्रकल्पांतर्गत सेंद्रीय खताच्या मदतीने शेतकºयांना तांदळाचे उत्पादन घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात आले होते. त्यानुसार शेतकºयांनी सेंद्रीय खतातून एचएमटी, डीआरके-२ यासह इतर वाणाच्या तांदळाचे उत्पादन घेतले आहे. यापूर्वी मुंबईत आयोजित प्रदर्शनातही या तांदळाला चांगली मागणी होती.
दिल्लीतील या प्रदर्शनात गडचिरोलीच्या शेतकºयांचा स्वतंत्र स्टॉल लागला असल्याचे आत्माचे प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश पवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: Organic Rice in Delhi Meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.