गडचिरोलीत वनौषधी वैैदू साहित्य संमेलनाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 12:30 PM2017-11-04T12:30:35+5:302017-11-04T12:31:06+5:30
देसाईगंज येथील आरोग्य प्रबोधिनी संस्थेच्या वतीने दुसरे गोंडवाना वैैदू साहित्य संमेलन ३० डिसेंबर २०१७ ला आयोजित करण्यात आले आहे.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : देसाईगंज येथील आरोग्य प्रबोधिनी संस्थेच्या वतीने दुसरे गोंडवाना वैैदू साहित्य संमेलन ३० डिसेंबर २०१७ ला आयोजित करण्यात आले आहे. परंपरागत ज्ञान जपणे व त्या ज्ञानाचा उपयोग लोककल्याणासाठी करण्याची वैैदुंची धडपड लक्षात घेऊन तसेच वैैदुंच्या कार्याला उजाळा देण्यासाठी वैैदू साहित्याची निर्मिती होऊन अभ्यासकांना नवीन संधी मिळणे याकरिता साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने स्मरणिकाही प्रकाशित होणार आहे. संमेलनात सहभागी होण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत वैैदुंनी आपल्या नावाची नोंदणी करावी, यात उपचार पद्धती, जैैव विविधतेच्या नोंदी कराव्या, असे संचालक डॉ. सूर्यप्रकाश गभणे यांनी कळविले आहे.