ओटी सजावट स्पर्धा उत्साहात
By admin | Published: October 19, 2015 01:57 AM2015-10-19T01:57:29+5:302015-10-19T01:57:29+5:30
लोकमत सखी मंच व कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी नवरात्र उत्सवानिमित्त कारगिल चौकातील दुर्गा उत्सव ...
सखी मंचतर्फे गडचिरोलीत कार्यक्रम : सारिका आखाडे प्रथम
गडचिरोली : लोकमत सखी मंच व कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी नवरात्र उत्सवानिमित्त कारगिल चौकातील दुर्गा उत्सव मंडळात ओटी सजावट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ओटी सजावट स्पर्धेत अनेक सखींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक सारिका राजेंद्र आखाडे यांनी पटकाविला. द्वितीय क्रमांक योगिता बारापात्रे, तृतीय क्रमांक प्रभा खोब्रागडे यांनी पटकाविला. प्रथम विजेत्या सखीस कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने ५०१, द्वितीय क्रमांकास सचिन हर्षे ज्वेलर्सतर्फे ३०१ ्ररूपये तर तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या सखीस श्वेता कन्हैया बैस यांच्यातर्फे २०१ रूपयांचे बक्षीस देण्यात आले. संध्या खडसे, सावित्री काबरा यांना प्रोत्साहन बक्षीस १०१ रूपये देण्यात आले. स्पर्धेत वंदना कनपुरवार, जयश्री चांदेकर, ज्योत्स्ना पोरेड्डीवार, मंजुषा खडसे, वंदना उप्परवार, रजनी भोयर, मंजुषा मोरे, रागिनी कापकर आदींनी एकापेक्षा एक सुंदर ओटी सजावट करून उपस्थितांची मने जिंकली. दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने सहभागी स्पर्धकांची ओटी भरण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण अॅड. कविता मोहरकर, सुचिता उदय धकाते, नीलिमा सुनील देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सोनिया बैस तर आभार सखी मंचच्या जिल्हा संयोजिका प्रीती प्रभाकर मेश्राम यांनी मानले. यशस्वीतेसाठी नम्रता चन्नावार, श्वेता बैस, प्रियांशू मेश्राम, शारदा खंडागळे, अर्चना भांडारकर, मंगला बारापात्रे, कृणाल उरकुडे व दुर्गा उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)