ओटी सजावट स्पर्धा उत्साहात
By admin | Published: October 29, 2015 02:02 AM2015-10-29T02:02:56+5:302015-10-29T02:02:56+5:30
लोकमत सखी मंच शाखा देसाईगंजच्या वतीने नवरात्र उत्सव अष्टमीनिमित्त समता शारदा महिला मंडळ गांधी वॉर्ड येथे घेण्यात आलेल्या...
देसाईगंजात कार्यक्रम : भजन, भावगीत, प्रार्थना व विविध गेम; सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
देसाईगंज : लोकमत सखी मंच शाखा देसाईगंजच्या वतीने नवरात्र उत्सव अष्टमीनिमित्त समता शारदा महिला मंडळ गांधी वॉर्ड येथे घेण्यात आलेल्या ओटी सजावट, भजन, भावगीत, प्रार्थना व विविध गेम शो ला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाच्या अध्यक्ष माधुरी श्रीराम गहाणे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून प्रिया अजय चरडे, तालुका संयोजिका कल्पना सुरेश कापसे, मंडळाच्या सचिव निर्मला मुरलीधर बुद्धे, निरीक्षक म्हणून अॅड. तृषा कपिल भैय्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरूवात शारदा मातेच्या मूर्तीला हार अर्पण व शारदास्तवनाने करण्यात आली. त्यानंतर घेण्यात आलेल्या ओटी सजावट स्पर्धेत अनेक सखींची सहभाग घेतला. यात प्रथम क्रमांक आशा बुद्धे, द्वितीय क्रमांक पल्लवी कुंभलवार यांनी पटकाविला. तर रंजना बुद्धे यांना प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले. खुल्या गटात प्रथम क्रमांक माधुरी हरणे, भजन स्पर्धेत वंदना हिवरे, वैशाली शेबे, भावगीत स्पर्धेत शोभा इलमुलवार, खुल्या गटात वैद्य यांनी सुयश प्राप्त केले. तर वन मिनीट गेम शोमध्ये प्रथम क्रमांक दीपा कोकोडे, द्वितीय क्रमांक निकिता कांबळे यांनी पटकाविला.
ओटी सजावट स्पर्धेचे प्रथम बक्षीस अशोक नाकतोडे यांच्याकडून ३०१ रूपये, द्वितीय राजेश बेलखुडे यांच्याकडून २५१ रूपये तर प्रोत्साहन बक्षीस मुरलीधर बुद्धे यांच्याकडून २०१ रूपये विजेत्या स्पर्धकांना देण्यात आले. लोकमत सखी मंचतर्फे महिलांसाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध होत असल्याने विविध कार्यक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन अॅड. तृषा भैय्या यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन रंजना बुद्धे तर आभार कुंता बुद्धे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सहसंयोजिका वनिता नाकतोडे, रिता ठाकरे, उमा बुद्धे, लीना बेलखुडे, राधिका पत्रे, सुनीता दिवटे, गीता शिंगाडे, दुर्गा नखाते, वसुंधरा वरखडे, मीनाक्षी डाबरे, माधुरी श्रीरामे, आरती भुते व मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)े