माेहझरीत डासांचा प्रादुर्भाव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:36 AM2021-02-10T04:36:50+5:302021-02-10T04:36:50+5:30

महागाईमुळे सामान्य ग्राहक त्रस्त मुलचेरा : मागील काही महिन्यांमध्ये सातत्याने महागाई वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीस आला आहे. ...

Outbreaks appear to be exacerbated during this time | माेहझरीत डासांचा प्रादुर्भाव वाढला

माेहझरीत डासांचा प्रादुर्भाव वाढला

Next

महागाईमुळे सामान्य ग्राहक त्रस्त

मुलचेरा : मागील काही महिन्यांमध्ये सातत्याने महागाई वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीस आला आहे. कोरोनाच्या संकटामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच महागाईमुळे जगण्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जळाऊ लाकडे उपलब्ध करून द्या

कुरुड (काेंढाळा) : सध्या काही नागरिकांकडे सिलिंडर घेण्याइतके पैसे नसल्यामुळे चुलीवरच स्वयंपाक करीत आहेत. त्यामुळे जळाऊ लाकडे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

तलावाचे सर्वेक्षण करावे

जाेगीसाखरा : जिल्ह्यातील मागील अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावाची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरवशावर शेती करावी लागत आहे. मामा तलाव नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तलावाचे सर्वेक्षण करून दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.

महा-ई-सेवा केंद्र अत्यल्प

भामरागड : जिल्ह्यात महा-ई-सेवा केंद्र तोकडे आहेत. परिणामी, महा-ई-सेवा केंद्र गाठण्यासाठी ६० ते ७० किमीचे अंतर कापावे लागते. त्यामुळे महा-ई-सेवा केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे. महा-ई-सेवा केंद्रामुळे लोकांना घरबसल्या दाखले मिळणार असले, तरी ही सेवा इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर अवलंबून असल्याने अनेकदा चकरा माराव्या लागतात.

जिल्ह्यातील सौरदिवे दुरुस्त करावे

रांगी : शासनाने लाखो रुपये खर्च करून जिल्ह्यातील विविध गावांत सौर पथदिवे सुरू केले. मात्र, यातील अर्धेअधिक सौरदिवे बंद अवस्थेत आहेत. दरम्यान, काही सौरदिव्यांच्या बॅटरी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.

जंगली प्राण्यांची गावाकडे धाव

भामरागड : तालुक्यातील काही गावांतील शेतशिवारात जंगली प्राण्यांचा वावर वाढला असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या उन्हाची चाहूल लागल्यामुळे जंगली प्राणी पाण्याच्या शोधात शेतशिवारात येत आहेत. त्यामुळे बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

वीज खांबामुळे अपघाताचा धोका

आरमाेरी : येथील अनेक वॉर्डांतील रस्त्यालगत असलेले वीज खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे खांब बदलण्याची मागणी होत आहे. यापूर्वी अनेकदा सदर खांब बदलण्याची मागणी नागरिकांकडून झाली आहे.

शौचालयाचा गैरवापर

घाेट : परिसरातील अनेक गावांत गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरुपयोगी वस्तू नागरिक शौचालयात भरून ठेवतात. त्यामुळे ग्रामीण भागात शौचालयाचा गैरवापर होत आहे. गोदरीमुक्तीबाबत प्रशासनाकडून प्रभावी जनजागृती केली जात नसल्याने, शौचालयाचा गैरवापर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जागृतीची गरज निर्माण झाली आहे.

बेरोजगारांमध्ये नैराश्य

देसाईगंज : परिसरात मोठ्या संख्येने सुशिक्षित बेरोजगार असून, त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे ते नैराश्यात सापडले आहेत. त्यामुळे या तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी परिसरात उद्योगाची निर्मिती करावी, अशी मागणी बेरोजगारांकडून केली जात आहे.

कोसा उत्पादकांना लोखंडी शिडी द्यावी

आरमाेरी : भोई-ढिवर समाजाचा मासेमारीसोबतच कोसा (रेशीम) उत्पादनावर भर आहे. आरमाेरी तालुक्यात चामाेर्शी माल, वणखी, वासाळा या गावांमध्ये कोसा उत्पादन माेठ्या प्रमाणात घेतल्या जाते. त्यामुळे झाडावरुन कोसा तोडण्यासाठी लोखंडी शिडी शासनाने सदर उत्पादकांना द्यावी, अशी मागणी कोसा उत्पादकांनी केली आहे.

धोकादायक पुलाला कठडे लावा

चामाेर्शी : जिल्ह्यात अनेक नाल्यांवर पुलांचे बांधकाम झाले आहे. मात्र, पुलाला संरक्षण कठडे नसल्याने अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे या पुलांवर कठडे लावण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील नाल्यांवर संरक्षण कठडे तुटले असून, काही चोरीलाही गेले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन नव्याने कठडे बांधावे, अशी मागणी होत आहे.

ट्रॅव्हल्समुळे अपघाताची शक्यता

गडचिराेली : शहरातील काही ट्रॅव्हल्सधारक रस्त्याच्या कडेला ट्रॅव्हल्स उभ्या ठेवतात. यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. शहराच्या मुख्य रस्त्यावर प्रवाशांकरिता ट्रॅव्हल्स उभ्या ठेवल्या जात आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

जिल्ह्यातील शिवभोजनाचे केंद्र वाढावे

गडचिराेली : शासनाने शिवभोजन केंद्र सुरू केली आहेत. मात्र, त्याच्यातील थाळींची संख्या मोजकीच ठेवली आहे, शिवाय केंद्रांची संख्या कमी आहे.

रस्त्यावरील वृक्षांना रेडियम पट्ट्या लावाव्या

गडचिराेली : तालुक्यातील अत्यंत वर्दळीचा व प्रमुख मार्ग समजल्या जाणाऱ्या गडचिराेली ते आरमाेरी रस्त्यावरील वृक्षांवर रेडियम पट्ट्या लावण्यात याव्या, अशी मागणी वाहतूकदारांकडून होत आहे. वृक्षावर रेडियम पट्टी लावल्यास रात्रीच्या अंधारात प्रवासासाठी सोयीचे होईल, त्यामुळे पट्ट्या लावण्यात याव्या, अशी मागणी आहे.

बचतगटांना कर्जपुरवठा करण्याची मागणी

आलापल्ली : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रात परिणाम पडला आहे. यामध्ये बचत गटांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बचत गटांनी कर्जपुरवठा करून त्यांना जीवनदान देणे सध्यातरी गरजेचे आहे.

पांदण रस्त्यामुळे भांडणे वाढली

एटापल्ली : ग्रामीण भागातील पांदण रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पांदण रस्ते आता संकटात आहे. शेतीची कामे सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये भांडणे होत आहेत.

रोजगार हमीची कामे सुरू करावी

वैरागड : परिसरात शेतमजुरांची संख्या बरीच आहे. मात्र, रोहयोची कामे सुरू करण्यात आली नाही. मागील वर्षी जिल्हा प्रशासनाने सिंचन व कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक कामे सुरू केली होती. त्यामुळे मजुरांच्या हाताला काेम मिळाले. मात्र, या वर्षी जॉब कार्डवाटप करूनही काम उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे कुटुंब कसे चालावे, हा प्रश्न मजुरांसमोर निर्माण झाला आहे.

Web Title: Outbreaks appear to be exacerbated during this time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.