काेविड केअर सेंटरमधील 200 वर कर्मचारी बेराेजगार हाेणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:34 AM2020-12-31T04:34:11+5:302020-12-31T04:34:11+5:30
गडचिराेली : जिल्ह्यातील काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उद्रेक सदृश्य परिस्थिती हाताळण्याकरिता काेराेनाकाळात पुरेसे मनुष्यबळ आवश्यक हाेते. त्यामुळे शासनाच्या निर्णयानुसार ...
गडचिराेली : जिल्ह्यातील काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उद्रेक सदृश्य परिस्थिती हाताळण्याकरिता काेराेनाकाळात पुरेसे मनुष्यबळ आवश्यक हाेते. त्यामुळे शासनाच्या निर्णयानुसार प्रशासनाने एप्रिल महिन्यात कंत्राटी स्वरूपात एकूण २१० कर्मचाऱ्यांची पदभरती केली. मात्र आता काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून पाॅझिटीव्ह रूग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे कंत्राटी स्वरूपात घेण्यात आलेल्या या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात येणार आहे.
गडचिराेली जिल्ह्यात जिल्हा मुख्यालयी दाेन शासकीय रूग्णालये आहेत. तालुकास्तरावर तीन उपजिल्हा रूग्णालय व नऊ ठिकाणी ग्रामीण रूग्णालये आहेत. या शिवाय जिल्हा परिषदेच्या आराेग्य विभागामार्फत ४५ प्राथमिक आराेग्य केंद्र व ३०० पेक्षा अधिक उपकेंद्र आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून आराेग्य विभागात व रूग्णालयातील अनेक पदे रिक्त आहेत. त्यातच काेराेनासारखी महामारीची परिस्थिती उद्भवल्यामुळे शासन व प्रशासनाला तातडीने कंत्राटी स्वरूपात कर्मचाऱ्यांची पदभरती करावी लागली. यातून अनेकांना राेजगार मिळाला.
बाॅक्स ......
या पदांचा समावेश
वैद्यकीय अधिकारी, सुपर स्पेशालिस्ट, भूलतज्ज्ञ, स्त्रीराेगतज्ज्ञ, बालराेगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी गट ब, प्रयाेगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, लॅब टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, वाॅर्ड बाॅय, स्टाॅफ नर्स व एलएचव्ही आदी पदे कंत्राटी स्वरूपात काेराेना काळासाठी पदे भरण्यात आली. अजुनही हे कर्मचारी सेवेत आहेत. मात्र ते अल्पकाळासाठी आहेत.
बाॅक्स .....
नियुक्ती आदेशातच स्पष्टता
विशेष कंत्राटी पदभरतीदरम्यान जिल्हाभरातील काेविड केअर सेंटरमध्ये तसेच रूग्णालयात मानधन तत्वावर कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती आदेशातच सेवा काळाबाबत स्पष्ट उल्लेख आहे. गडचिराेली शहरात तीन काेविड केअर सेंटर आहेत. ११ तालुक्यांमध्ये ११, आष्टी व मार्कंडादेव येथे प्रत्येकी १ असे जवळपास १८ ते २० काेविड केअर सेंटर आहेत. काेविडचा उद्रेक थांबविण्यासाठी घेण्यात आलेली ही २०० वर पदे राज्य शासनाची अथवा राष्ट्रीय आराेग्य अभियानाची नाहीत. त्यामुळे काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित येईपर्यंत नियुक्ती राहील. काेराेना समस्या मिटल्यानंतर नियुक्ती संपुष्टात येईल, असे आदेशात नमुद आहे.
काेट .......
काेविड केअर सेेंटरमधील कर्मचाऱ्यांना दाेन ते तीन महिन्यांचा आदेश देत हाेताे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा प्रश्नच निर्माण हाेत नाही आणि तशी मागणी सुद्धा आमच्याकडे अजून आली नाही. आता काेराेनाचा प्रादुर्भाव कमी हाेत असून जिल्ह्यात रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे काेराेना ड्यूटीसाठी घेतलेल्या काही कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली जाणार आहे.
- डाॅ.शशिकांत शंभरकर,
जिल्हा आराेग्य अधिकारी,
जि.प.गडचिराेली
काेट ........
काेराेना विरूद्ध लढा देण्याच्या कामात आम्ही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. काेराेना संकटाच्या काळात आम्ही आमची सेवा प्रामाणिकपणे बजावली आहे. त्यामुळे शासनाने आम्हाला आराेग्य विभागातच पुन्हा काम उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून आम्हाला रुग्णांची सेवा निरंतर करता येईल.
- राेशन हुलके,
कंत्राटी कर्मचारी
काेट ....
नियमित कर्मचाऱ्यांसाेबतच आम्ही रुग्णांना आराेग्यसेवा याेग्यरित्या देण्याचे काम केले आहे. जिवाची पर्वा न करता काेराेना संकटकाळात आम्ही लढा दिला आहे. काेराेना रुग्ण बरे हाेण्यात आमचा हातभार लागला आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना आणखी काही महिने काम मिळाल्यास राेजगार उपलब्ध हाेईल.
- मृणाली भाकरे,
कंत्राटी कर्मचारी