महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांचा धुमाकूळ, रस्त्याच्या कामावरील 27 पेक्षा जास्त वाहने जाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 09:47 AM2019-05-01T09:47:58+5:302019-05-01T09:48:13+5:30

राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा होत असताना गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी मोठ्या प्रमाणात जाळपोळ करून धुमाकूळ घातला.

Over 27 vehicles were burnt by the Naxalist, road work on Maharashtra day | महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांचा धुमाकूळ, रस्त्याच्या कामावरील 27 पेक्षा जास्त वाहने जाळली

महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांचा धुमाकूळ, रस्त्याच्या कामावरील 27 पेक्षा जास्त वाहने जाळली

Next

- सिराज पठाण
कुरखेडा (गडचिरोली) : राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा होत असताना गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी मोठ्या प्रमाणात जाळपोळ करून धुमाकूळ घातला. छत्तीसगड सीमेकडील भागात सशस्त्र नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील 27 पेक्षा जास्त वाहने आणि डांबर प्लांटला आग लावली. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. ही घटना कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे मध्यरात्रीपासून पहाटे 3.30 दरम्यान घडली.

पुराडा-मालेवाडा-येरकड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १३६ चे काम सुरू आहे. हे काम छत्तीसगडमधील दुर्ग येथील अमर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीद्वारे करण्यात येत आहे. या कंपनीचा दादापूर येथे गावाशेजारीच डांबर प्लांट व दोन कार्यालयेही आहेत. तेथे रस्त्याच्या कामवरील अनेक वाहने होती. मध्यरात्री दीडशेहून अधिक सशस्त्र नक्षली दादापूर येथे गेले. त्यांनी ठिकठिकाणी शासनाविरोधात मजकूर लिहिलेले बॅनर लावले आणि नंतर वाहने व अन्य यंत्रसामग्रीला आग लावली. या आगीत ११ टिप्पर, डांबर पसरविणारी मशिन, डिझेल व पेट्रोल टँकर, मोठे रोलर अशी तब्बल 27हून अधिक वाहने, मोठे जनरेटर व दोन कार्यालये जाळली, अशी माहिती प्लांट अधिकाऱ्यानं दिली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

Web Title: Over 27 vehicles were burnt by the Naxalist, road work on Maharashtra day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.