क्रियाशील होऊन परिस्थितीवर मात करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 11:47 PM2017-09-01T23:47:10+5:302017-09-01T23:47:34+5:30
कृषी प्रधान भारत देशात शेतकरी आत्महत्या हा अतिशय चिंतेचा विषय आहे. महाराष्टÑात शेतकºयांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कृषी प्रधान भारत देशात शेतकरी आत्महत्या हा अतिशय चिंतेचा विषय आहे. महाराष्टÑात शेतकºयांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र शेतकºयांच्या मुलांनी खचून न जाता जागृत होऊन लढा देण्याची गरज आहे. शेतकºयांच्या मुलांनी क्रियाशील होेऊन परिस्थितीवर मात करावी, असे आवाहन सुप्रसिद्ध कवी प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी केले.
वर्धानजीकच्या सेवाग्राम येथील बापूकुटीपासून सुरू झालेले ‘बळीराजांच्या मुलांशी संवाद’ हे अभियान प्रा. वाकुडकर यांनी सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत गडचिरोेली येथील धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयात गुरूवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव देवराव म्हशाखेत्री होते. प्रमुख अतिथी म्हणून गोविंदराव बानबले, माजी प्राचार्य खुशाल वाघरे, प्रा. शेषराव येलेकर, युथ फॉर स्वराज्यचे राष्टÑीय अध्यक्ष मनीष कुमार, अॅड. शकील अहमद, प्रा. बी.एस. चिकटे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. वाकुडकर यांनी आजचा विद्यार्थी क्रियाशील होऊन जागा झाला पाहिजे, असे सांगून त्यांनी काव्य सादर केले.
‘बळीराज्याच्या मुला या मातीची शपथ घेऊनी, असे सांगतो तुला रे... बळी राजाच्या मुला... भीष्म, कर्ण अन् पांडव सारे, एक होवू चला रे... बळीराजाच्या मुला, बळीराजाच्या मुला रे... बळीराजाच्या मुला !!
अशा अनेक कविता प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी सादर करून बळीराजाच्या मुलांना उपदेश पूर्व मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. विलास खुणे तर आभार प्रा. स्वप्नील ढोमणे यांनी मानले.
समस्या मार्गी लावण्यासाठी झटा-मनीषकुमार
शेतकºयांनी आत्महत्या न करता समस्या सोडविण्यासाठी लढा दिला पाहिजे. यासाठी युवकांनी एकत्र येण्याची गरज आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले असते तर शेतकºयांची अशी स्थिती निर्माण झाली नसती. त्यामुळे शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले यांच्या विचारांच्या युवकांनी एकत्र येऊन सद्याच्या परिस्थितीशी लढा उभारावा, असे आवाहन युथ फॉर स्वराज्याचे राष्टÑीय अध्यक्ष मनीषकुमार यांनी केले.