सर्वाेदय वाॅर्डात रात्रीचा प्रवास धाेक्याचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:45 AM2021-09-16T04:45:49+5:302021-09-16T04:45:49+5:30
गडचिराेली : शहरात मागील काही दिवसांपूर्वी माेकाट जनावरांचा बंदाेबस्त करण्याची माेहीम स्थानिक प्रशानाने सुरू केली हाेती. या माेहिमेला काही ...
गडचिराेली : शहरात मागील काही दिवसांपूर्वी माेकाट जनावरांचा बंदाेबस्त करण्याची माेहीम स्थानिक प्रशानाने सुरू केली हाेती. या माेहिमेला काही प्रमाणात यश मिळाले. परंतु आता शहरात माेकाट कुत्र्यांचा हैदाेस दिसून येत आहे. शहरातील अनेक वाॅर्डांमध्ये माेकाट कुत्र्यांच्या झुंडी रात्रीच्या सुमारास दिसून येतात. त्यामुळे रात्री एकट्यादुकट्याने प्रवास करणे धाेक्याचे ठरत आहे. शहरातील सर्वाेदय वाॅर्ड, इंदिरानगर व फुले वाॅर्डात सर्वाधिक माेकाट कुत्रे दिसून येतात. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून हाेत आहे.
गडचिराेली शहरातील प्रमुख वाॅर्डांसह इंदिरा गांधी चाैक, बस आगार परिसर, आयटीआय चाैक, काॅम्प्लेक्स, स्नेहनगर, आरमाेरी राेड तसेच अन्य भागामध्ये माेकाट कुत्रे माेठ्या प्रमाणात ठाण मांडून बसून असतात. रात्रीच्या सुमारास या कुत्र्यांपासून नागरिकांना सर्वाधिक धाेका आहे.
बाॅक्स...
तात्काळ बंदाेबस्त करा
शहरातील विविध वाॅर्डात माेकाट कुत्र्यांचा हैदाेस वाढला आहे. रात्रीच्या सुमारास वाॅर्डावाॅर्डात ही कुत्री ठाण मांडून बसतात. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना धाेका हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. बहुतांश माेकाट कुत्री हिंस्त्र राहत असल्याने ती चावा घेण्याची शक्यता असते. यामध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा समावेश असला तर रेबीजसारख्या राेगाची लागण हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदाेबस्त करावा.
बाॅक्स...
नसबंदी आवश्यक
नगर परिषद प्रशासनाकडून माेकाट कुत्रे, जनावरे व डुकरांचा बंदाेबस्त करण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाते. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने सुद्धा याबाबत कुत्र्याच्या नसबंदीसाठी निधीची तरतूद करणे गरजेचे आहे. शहरातील माेकाट जनावरांचा बंदाेबस्त करण्याची तसेच त्यांना ॲन्टीरेबिज लस टाेचण्याची मागणी शहरातील नागरिकांकडून प्रशासनाकडे केली जात आहे.
बाॅक्स...
लहान मुलांना धाेका
माेकाट कुत्री व डुकरांपासून लहान मुलांना सर्वाधिक धाेका असते. बहुतांश माेकाट कुत्री हिंस्त्र राहत असल्याने ते दिवसभर इकडेतिकडे हुंदडत असतात व रात्री चाैकाचाैकात भुंकतात. तसेच रस्त्याने एकटेदुकटे येत असलेल्या नागरिकांवर हल्ला करण्याची शक्यता असते. शहरात असे बरेच प्रकार घडले आहेत. बहुतांश नागरिक कुठलीही तक्रार स्थानिक प्रशासनाकडे न करता रुग्णालयात उपचार घेतात.
काेट...
शहरातील माेकाट जनावरांच्या बंदाेबस्ताची माेहीम हाती घेण्यात आली हाेती. ती सध्या सुरूच आहे. याशिवाय शहरातील माेकाट कुत्री, डुकरे आदींचा बंदाेबस्त केला जाणार आहे. याबाबत विचारविनिमय सुरू आहे. माेकाट कुत्री व डुकरे यांचा बंदाेबस्त करण्यासाठी नगर परिषद प्रशासन कटिबद्ध आहे.
- रवींद्र भंडारवार, उपमुख्याधिकारी, न.प. गडचिराेली
...............
आम्ही सर्वाेदय वाॅर्डात राहताे. येथे गेल्या दाेन महिन्यांपासून माेकाट कुत्र्यांचा हैदाेस वाढला आहे. आमच्या घराच्या परिसरात ही कुत्री येऊन रात्रीच्या सुमारास भुंकतात. त्यामुळे झाेपमाेड हाेते. अनेकदा चाेरही आल्यानंतर भुंकत असल्याने दाेघांपासूनही भीती वाटते.
- सुनीता भैसारे, नागरिक
..............
गडचिराेली शहरातील स्नेहनगर भागात रामनगर परिसर तसेच लांझेडा भागातून माेकाट कुत्रे येतात. बहुतांश कुत्रे स्टेडियमच्या परिसरात जाऊन कळपाने राहतात. त्यामुळे जाेरजाेराने भुंकतात. याचा त्रास आम्हाला हाेताे. त्यामुळे कुत्र्यांचा बंदाेबस्त करावा.
- गीता बडवाईक, नागरिक