ऑक्सिजन प्लँट लवकरच सुरू हाेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:26 AM2021-06-18T04:26:14+5:302021-06-18T04:26:14+5:30
प्लँटसाठी तत्काळ वीजपुरवठा मिळावा यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक रुडे गडचिरोली यांनी महावितरणकडे १३० के.व्ही. वीज पुरवठ्यासाठी दि. २७ ...
प्लँटसाठी तत्काळ वीजपुरवठा मिळावा यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक रुडे गडचिरोली यांनी महावितरणकडे १३० के.व्ही. वीज पुरवठ्यासाठी दि. २७ एप्रिल रोजी अर्ज सादर केला. त्यावर तातडीने कार्यवाही करून महावितरणने वीज पुरवठ्यासाठी लागणाऱ्या वाहिनी व रोहित्राचे अंदाजपत्रक तत्काळ २८ एप्रिलला मंजूर करून वाहिनी उभारणीचे काम त्वरित सुरू केले. जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोलीतर्फे अंदाजपत्रकीय रकमेचा भरणा १४ जून २०२१ रोजी करण्यात आला. विद्युत निरीक्षक कार्यालयाने संपूर्ण उभारण्यात आलेल्या विद्युत यंत्रणेचे परीक्षण करून वीजपुरवठा सुरू करण्यास परवानगी दिली. गुरुवारी महावितरण गडचिरोली मंडळ कार्यालयाद्वारे चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांचे मार्गदर्शनात गडचिरोली प्रविभागाचे प्रभारी अधीक्षक अभियंता रवींद्र गाडगे, गडचिरोली विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता शैलेश वाशिमकर, उपविभागाचे प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम वंजारी, संकुल वीज वितरण केंद्राचे सहायक अभियंता प्रफुल्ल पिंपळकर यांच्या उपस्थितीत आज दि. १७ जून राेजी ऑक्सिजन प्लँटचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला.
या ऑक्सिजन प्लँटला एक्सप्रेस फीडरवरून वीजपुरवठा देण्यात आला आहे. सोबतच ११ के. व्ही. कॉम्प्लेक्स फीडरवरूनही बॅक फीड वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे या प्लँटचा वीजपुरवठा अबाधित राहणार आहे.