गोंडवानाकडून जमीन मोजणीच्या कामाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 11:51 PM2018-01-25T23:51:37+5:302018-01-25T23:51:49+5:30

 The pace of calculation of land by Gondwana | गोंडवानाकडून जमीन मोजणीच्या कामाला गती

गोंडवानाकडून जमीन मोजणीच्या कामाला गती

googlenewsNext
ठळक मुद्देसर्च रिपोर्ट तयार होणार : गोगाव-अडपल्ली गावानजीक विद्यापीठासाठी संपादित करणार जमीन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने येथील गोंडवाना विद्यापीठासाठी आवश्यक असणाऱ्या २०० एकर जमीन संपादनासाठी विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे ८९ कोटी ३ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. आर्थिक तरतूद झाल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने भूमी अभिलेख विभागाच्या सहकार्यातून आरमोरी मार्गावरील गोगाव-अडपल्ली परिसरातील शेतकºयांची खासगी जमीन व शासकीय जमिनीच्या मोजणीचे काम सुरू केले असून या कामात गती आली आहे.
भूमी अधिग्रहणासाठी प्रशासनातर्फे जमिनीचा सर्च रिपोर्ट काढण्याचेही काम सुरू आहे. गोंडवाना विद्यापीठाला २०० एकर जमिनीची आवश्यकता आहे. जागेअभावी विद्यापीठाचा विकास व विविध भौतिक सुविधा रखडल्या आहेत. जमीन खरेदी करून संपादीत करण्यासाठी राज्य सरकारने गोंडवाना विद्यापीठाला पुरेसा निधी द्यावा, अशी मागणी विद्यापीठ प्रशासनाने शासनाकडे केली होती. त्यानंतर कुलगुरू व कुलसचिवांनी वारंवार पाठपुरावा करून विद्यापीठाची अडचण शासनापुढे मांडली. त्यानंतर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेऊन विद्यापीठाच्या जागेसाठी ८९ कोटी ३ लाख रूपयांची तरतूद केली. त्यापूर्वीच विद्यापीठ प्रशासनाने शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांची खासगी जमीन विद्यापीठाला देण्याची मागणी केली होती. त्याअंतर्गत अडपल्ली-गोगाव परिसरातील १३ शेतकऱ्यांनी आपली ३५ एकर जमीन देण्याबाबचे संमतीपत्र विद्यापीठ प्रशासनाकडे सादर केले आहे. आता निधीची तरतूद झाल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने जमीन संपादनाची कार्यवाही गतीने सुरू केली आहे.
जमीन मिळाल्यानंतर या सुविधा होणार
चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यासाठी २०११ मध्ये स्थापन झालेल्या गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाशी एकूण २०५ महाविद्यालये संलग्नित आहेत. १५० ते २०० एकर जागा संपादीत झाल्यानंतर या ठिकाणी प्रशस्त ग्रंथालय, शाखानिहाय अभ्यासक्रमाचे स्वतंत्र विभाग, प्रशासकीय भवन, कार्यालयीन विभाग, महाविद्यालय कॅम्पस व इतर सोयीसुविधा होणार आहेत. यासंदर्भात प्राथमिक स्वरूपाचे नियोजन विद्यापीठ प्रशासनातर्फे झाले आहे.
८९ कोटींचा निधी बीडीएसवर प्राप्त नाही
गोंडवाना विद्यापीठासाठी लागणारी २०० एकर जमीन खरेदी करून संपादीत करण्यासाठी राज्याच्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे ८९ कोटी ३ लाख रूपयांची तरतूद झाली आहे. मात्र सदर निधी विद्यापीठाच्या बीडीएसवर अद्यापही प्राप्त झाला नसल्याची माहिती विद्यापीठाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. जमीन संपादीत करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाला तरतूद केलेला हा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी केली आहे.

Web Title:  The pace of calculation of land by Gondwana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.