श्रीदत्त मंदिरात महादेवाची पाचपावली पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:32 AM2021-03-14T04:32:16+5:302021-03-14T04:32:16+5:30

चामोर्शी - दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी चामोर्शीजवळील श्रीदत्त व नाग मंदिर देवस्थान येथे महाशिवरात्रीपासून तर होळी सणापर्यंत पाचपावली पूजा करण्याची धार्मिक ...

Pachpavli worship of Lord Shiva in Shridatta temple | श्रीदत्त मंदिरात महादेवाची पाचपावली पूजा

श्रीदत्त मंदिरात महादेवाची पाचपावली पूजा

googlenewsNext

चामोर्शी - दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी चामोर्शीजवळील श्रीदत्त व नाग मंदिर देवस्थान येथे महाशिवरात्रीपासून तर होळी सणापर्यंत पाचपावली पूजा करण्याची धार्मिक परंपरा आहे, त्यामुळे महादेव यात्रा करून आल्यानंतर भाविक पाचपावली पूजा करीत असतात. काेराेनाच्या शासनाच्या अटी-शर्तीचे पालन करून मास्क व सामाजिक अंतर ठेवून महादेवाची पाचपावली पूजा मधुकर महाराज बोदलकर यांच्या हस्ते १२ मार्च रोजी पार पडली.

पाचपावली पूजेसाठी महादेवाचे फोटो, मुंडी चार डेअरी असलेले जांभळीच्या झाडाचा मंडप, आंब्याचे तोरण, हार-फुले, फुलांची हार, नारळ, विळ्याचे पान, पाच प्रकारची फळे, पूजेचे साहित्य, दही, दूध, कणकीच्या दिव्याचा खण, लाखोळीच्या डाळीचे वडे, पुऱ्या, पूजाअर्चा महादेवाचे गाणे, लग्न, आरती आदी विधीनंतर प्रसाद वितरित केला जातो.

यावेळी माजी सरपंच मालन बोदलकर, सुनंदा ढाक, डोनुजी बोदलकर, होमदेव गडकर, विलास कुकडे, महादेव पिपरे, सिंधू कुकडे, अर्चना बुरे, कुंदा बोदलकर, किरण पिपरे हे कोरोनाचे सर्व नियम पाळून उपस्थित होते.

Web Title: Pachpavli worship of Lord Shiva in Shridatta temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.