परतीचा पाऊस व रोगांमुळे धानपीक धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 11:51 PM2017-10-21T23:51:41+5:302017-10-21T23:51:54+5:30
देसाईगंज तालुक्यात परतीच्या पावसामुळे तसेच धानपिकावरील तुडतुडा व इतर रोगांमुळे अनेक शेतकºयांचे धानपीक धोक्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : देसाईगंज तालुक्यात परतीच्या पावसामुळे तसेच धानपिकावरील तुडतुडा व इतर रोगांमुळे अनेक शेतकºयांचे धानपीक धोक्यात आले आहे. परतीच्या पावसामुळे धानपीक कुजले असल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे. याबाबत प्रत्यक्ष वस्तूस्थिती जाणून घेण्यासाठी आ. कृष्णा गजबे यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर पोहोचून पीक परिस्थितीची पाहणी केली.
कृषी व महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने शेतातील धानपिकांचे सर्वेक्षण करून पंचनामे करण्यात यावे, नुकसानग्रस्त शेतकºयांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठीचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठविण्यात यावा, असे आदेश आ. गजबे यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले आहे. ऐन दिवाळी सणाच्या कालावधीत तालुक्यातील बोडधा, कोरेगाव, चोप, रावणवाडी, शंकरपूर आदी परिसरात परतीच्या पावसाने पुनरागमन केल्यामुळे कापणी झालेल्या हलक्या प्रतीच्या धानाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच कापलेले धान पावसामुळे शेतजमिनीत कुजले.
याशिवाय उभ्या असलेल्या धानपिकावर तुडतुडा या रोगाचा प्रादूर्भाव झाला. यावर उपाय म्हणून शेतकºयांनी कीटकनाशकाची फवारणी केली. मात्र त्याचा काहीही परिणाम रोगावर झाला नाही. नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत मिळण्यासाठी कृषी व महसूल विभागाच्या अधिकाºयांनी पिकांची प्रत्यक्ष पाहणी करावी, विमा काढलेल्या शेतकºयांचे प्रस्ताव संबंधित बँकांकडे पाठवून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, असे आ. गजबे यांनी सांगितले.