शेततळ्याने धान पिकास संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:26 AM2017-10-28T00:26:57+5:302017-10-28T00:27:09+5:30
राज्य शासनाच्या वतीने कृषी विभागामार्फत गेल्या दोन वर्षांपासून ‘मागेल त्याला शेततळे’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबविली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्य शासनाच्या वतीने कृषी विभागामार्फत गेल्या दोन वर्षांपासून ‘मागेल त्याला शेततळे’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबविली जात आहे. याशिवाय रोजगार हमी योजना, जलयुक्त शिवार अभियानातूनही शेततळे खोदण्यास संधी आहे. या योजनांचा फायदा घेऊन चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरातील अनेक शेतकºयांनी गतवर्षी शेततळे खोदले. सदर शेततळ्यामुळे धान व इतर पिकास सिंचनाची सुविधा झाली आहे. शेततळे यंदाच्या खरीप हंगामातील धान पिकास नवसंजिवनी ठरले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात तालुक्यात १९८० च्या वनकायद्यामुळे अनेक मोठे व मध्यम सिंचन प्रकल्प रखडले. परिणामी गेली काही वर्षे येथील शेतकºयांना दुष्काळाचा सामना करावा लागला. मात्र राज्य शासनाच्या वतीने शेततळ्याची योजना कार्यान्वित केल्यानंतर काही प्रमाणात सिंचनाची सुविधा बहुतांश भागात झाली आहे.
चामोर्शी तालुक्यातील नवीन वाकडी या गावालगतच्या शेतात शेतकºयांनी शेततळे खोदले आहे. या शेततळ्यातून धान पिकासाठी सिंचनाची सुविधा झाली आहे. रबीतील भाजीपाला पिकेही घेणे आता शक्य होणार आहे.