७० हजार क्विंटलवर धान खरेदी पोहोचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 09:26 PM2019-06-10T21:26:09+5:302019-06-10T21:26:35+5:30

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत सन २०१८-१९ या रबी हंगामात जिल्ह्यात उन्हाळी धानाची खरेदी केली जात आहे. महामंडळाच्या वतीने आतापर्यंत रबी हंगामात एकूण ६९ हजार ५०३ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. गेल्या दोन दिवसात ही खरेदी ७० हजार क्विंटलच्या वर पोहोचली आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालय व अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाच्या वतीने रबी हंगामातील धान खरेदीसाठी ४० वर केंद्र सुरू करण्यात आले आहे. ज्या भागात उन्हाळी धानपिकाचे उत्पादन घेतले जाते, अशा भागात नजीकच्या केंद्रावर विक्रीसाठी धानाची आवक शेतकऱ्यांकडून होत आहे.

Paddy procurement reached 70 thousand quintals | ७० हजार क्विंटलवर धान खरेदी पोहोचली

७० हजार क्विंटलवर धान खरेदी पोहोचली

Next
ठळक मुद्देजिल्हाभरात ३२ केंद्रांवर आवक : उन्हाळी धानासाठी महामंडळाची सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत सन २०१८-१९ या रबी हंगामात जिल्ह्यात उन्हाळी धानाची खरेदी केली जात आहे. महामंडळाच्या वतीने आतापर्यंत रबी हंगामात एकूण ६९ हजार ५०३ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. गेल्या दोन दिवसात ही खरेदी ७० हजार क्विंटलच्या वर पोहोचली आहे.
आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालय व अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाच्या वतीने रबी हंगामातील धान खरेदीसाठी ४० वर केंद्र सुरू करण्यात आले आहे. ज्या भागात उन्हाळी धानपिकाचे उत्पादन घेतले जाते, अशा भागात नजीकच्या केंद्रावर विक्रीसाठी धानाची आवक शेतकऱ्यांकडून होत आहे.
गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत धानोरा, कुरखेडा, चामोर्शी, कोरची, देसाईगंज, आरमोरी या तालुक्यात रबी हंगामासाठी केंद्र सुरू करण्यात आले आहे. गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत आतापर्यंत एकूण १७ केंद्रांवर धानाची आवक झाली आहे. या केंद्रांवरून ४१ हजार ६७३ क्विंटल इतकी धानाची खरेदी करण्यात आली आहे. अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत सिरोंचा, अहेरी व इतर तालुक्यात मिळून जवळपास १५ केंद्रांवरून आतापर्यंत २७ हजार ८३० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली.
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने खरीप व रबी अशा दोन्ही हंगामात आविका संस्थेच्या सहकार्याने धानाची खरेदी केली जाते. रबी हंगामात शेतकऱ्यांची केंद्रांअभावी ससेहोलपट होऊ नये यासाठी महामंडळाच्या वतीने धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत रबी हंगामात महामंडळाकडून धानाची खरेदी करण्यात येणार आहे. त्यानंतर रबी हंगाम संपतो. सिंचन सुविधेमुळे उन्हाळी धानाचे उत्पादन वाढले आहे.
धान भरडाईचे काम ५० टक्क्यांवर
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत यंदाच्या खरीप हंगामात ७ लाख २७ हजार ८९८ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी ५ लाख ५९ हजार ७५९ क्विंटल धान भरडाईसाठी राईस मिलर्सकडे देण्यात आले. यापैकी ७३.८२ टक्के काम धान भरडाईचे झाले आहे. भरडाईनंतरचा तांदूळ जिल्हा पुरवठा अधिकाºयांकडे जमा करण्यात आला आहे. याशिवाय अहेरी उपप्रादेशिक कार्यालयामार्फत खरीप हंगामात २ लाख ८२ हजार ४५७ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. या भागात भरडाईचे काम मंद गतीने सुरू आहे.

Web Title: Paddy procurement reached 70 thousand quintals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.