कुरखेडा तालुक्यात धान खरेदी केंद्र सुरू
By admin | Published: November 12, 2016 02:16 AM2016-11-12T02:16:01+5:302016-11-12T02:16:01+5:30
तालुक्यात चार ठिकाणी आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन आ. क्रिष्णा गजबे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
आमदारांच्या हस्ते उद्घाटन : कढोली, खरकाडा, गोठणगाव, कुरखेडात शुभारंभ
कुरखेडा : तालुक्यात चार ठिकाणी आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन आ. क्रिष्णा गजबे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
कुरखेडा येथे आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने धान खरेदी केंद्राचा शुभारंभ आमदारांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी खिळसागर नाकाडे, बँकेचे संचालक खेमनाथ डोंगरवार, उपप्रादेशिक व्यवस्थापक वानखेडे, पं. स. सदस्य चांगदेव फाये, विलास गावंडे, दिगांबर मानकर, दोषहर फाये, रामहरी उगले उपस्थित होते. धान खरेदी केंद्रावर बारदाना तसेच इतर साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. गोठणगाव येथे धान खरेदी केंद्राच्या शुभारंभप्रसंगी आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे सभापती यशवंत चौरीकर, उपसभापती मोहन कुथे, हिराजी माकडे, जीवन मेश्राम, प्रभू गुरनुले, रघुनाथ तुलावी, सुकराम सहारे, रमेश तुलावी, तेजराम सहारे, विजय कुथे उपस्थित होते.
कढोली येथील धान खरेदी केंद्राच्या उद्घाटनाला तहसीलदार अजय चरडे, सरपंच चंद्रकांत चौके, पं. स. सदस्य महादेव नाकाडे, फाल्गुन नारनवरे, भाग्यवान टेकाम, बँकेच्या व्यवस्थापक घुबडे, संस्थेचे व्यवस्थापक बोरकर, बाबुराव जेंगठे, काशिनाथ दोनाडकर, चुडामणी वाघ, मंडळ अधिकारी शील, तलाठी जांभुळकर व शेतकरी उपस्थित होते.
खरकाडा येथील धान खरेदी केंद्राच्या उद्घाटनाला आ. क्रिष्णा गजबे यांच्यासह आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे सभापती मुखरू टेकाम, उपसभापती काशिनाथ भोयर, पं. स. सदस्य महादेव नाकाडे, उपसरपंच पिराज नाकाडे, मधुकर होळी, रघुनाथ बांगडकर, मुकुंदा टेकाम, व्यवस्थापक मदनकर, सुरेश खुणे, दुर्वास बांगडकर संस्थेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
धान खरेदी केंद्रावर बारदान्यासह सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. खरेदी केंद्रावरच धान विक्रीस आणावे, असे आवाहन आमदारांनी केले. (तालुका प्रतिनिधी)