कृषी विभागाचे धान बियाणे निघाले बोगस

By admin | Published: October 29, 2015 02:04 AM2015-10-29T02:04:00+5:302015-10-29T02:04:00+5:30

तालुका कृषी कार्यालय गडचिरोलीच्या वतीने महाबिज कंपनीच्या सांबा-मसुरी जातीचे संकरीत धान बियाणे तालुक्यातील येवली...

Paddy seed for agriculture department bogs out | कृषी विभागाचे धान बियाणे निघाले बोगस

कृषी विभागाचे धान बियाणे निघाले बोगस

Next

शेतकऱ्यांची फसवणूक : नुकसानभरपाई न दिल्यास आंदोलन छेडणार
गडचिरोली : तालुका कृषी कार्यालय गडचिरोलीच्या वतीने महाबिज कंपनीच्या सांबा-मसुरी जातीचे संकरीत धान बियाणे तालुक्यातील येवली व गोविंदपूर येथील शेतकऱ्यांना शासनाच्या कृषी अनुदान योजनेंतर्गत पुरविण्यात आले. मात्र १५० दिवसांचा कालावधी उलटूनही शेतकऱ्यांच्या धानपिकाला फुटवे आले नाहीत. कृषी विभागाचे बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे.
यासंदर्भात येवली येथील सेवा सहकारी संस्थेचे सभापती चोखाजी भांडेकर, येवलीच्या सरपंच गीता सोमनकर, उपसरपंच सुरेखा भांडेकर, काशिनाथ लटारे, लोमेश कोहळे आदींसह गोविंदपुरातील अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने त्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. नुकसानभरपाई न दिल्यास कृषी विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
यासंदर्भात सहकारी संस्थेचे सभापती चोखाजी भांडेकर व येवलीच्या सरपंच गीता सोमनकर यांनी म्हटले आहे की, तालुका कृषी विभागाच्या वतीने महाबिज कंपनीचे सांबा-मसुरी जातीचे संकरीत धान बियाणे येवली व गोविंदपूर येथील शेतकऱ्यांना अनुदानावर पुरविण्यात आले. बियाणे पुरविताना सदर बियाणे १२५ ते १३० दिवसांच्या मुदतीचे असून या वाणातून भरघोस उत्पादन येते असे कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र १४० ते १५० दिवसांचा कालावधी उलटूनही धानपिकाला फुटवे आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महाबिज कंपनीच्या सांबा-मसुरी या वाणाची मुळातच उगवण क्षमता फारच कमी आहे. अनेकदा पाणीपुरवठा करूनही धानाचे लोंब भरले नाही. उलट धानपिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पीक नष्ट झाले आहे.
येवली व गोंविदपूर गावातील शेतकऱ्यांनी कर्ज काढून महाबिज धानबियाण्यांची लागवड आपल्या शेतात केली. यासाठी शेतकऱ्यांना रोवणी व मजुरीचा खर्च उचलावा लागला. मात्र आता बियाणे भरत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुष्काळ, रोग व बोगस बियाण्यांमुळे शेतकरी प्रचंड चिंताग्रस्त झाले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Paddy seed for agriculture department bogs out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.