पंधरवड्यापासून वडधातील धान खरेदी केंद्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:36 AM2021-03-21T04:36:33+5:302021-03-21T04:36:33+5:30
वडधा परिसरातील शेतकऱ्यांसाठी आरमोरी खरेदी-विक्री सहकारी संस्थेअंतर्गत वडधा येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ...
वडधा परिसरातील शेतकऱ्यांसाठी आरमोरी खरेदी-विक्री सहकारी संस्थेअंतर्गत वडधा येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाेदामामध्ये खरेदी केंद्र मागील दोन महिन्यांपासून सुरू होते. मात्र, गाेदामाची क्षमता संपल्याने पंधरा दिवसांपासून खरेदी केंद्र बंद पडले आहे. त्यातच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांचा खरेदी न झालेला धान बाहेर पडून आहे. खरीप हंगामाची धान विक्री करण्याची मुदत मार्चपर्यंत आहे. त्यातच २८ व २९ मार्चला होळीचा सण असल्याने ३१ मार्चपूर्वीच खरेदी बंद होण्याची शक्यता आहे. असे असताना गोदामाअभावी खरेदी केंद्र बंद असल्याने धान विक्री करण्याचे संकट निर्माण झाले आहे. वडधा येथे धान खरेदी सुरू झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी नाेंदणी करुन टाेकन मिळविले हाेते. नाेंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना धान विक्रीची प्रतीक्षा हाेती. परंतु त्यांना धान विक्रीसाठी केंद्रावरुन फाेन आला नाही. शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेतच राहिले. आता मुदत संपण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.
बाॅक्स
गाेदामाची व्यवस्था करण्याकडे दुर्लक्ष
वडधा येथे आधारभूत धार खरेदीसाठी खरेदी-विक्री संघाने गाेदामाची व्यवस्था केलीच नाही. धान विक्री करण्यासाठी केवळ पाच ते सहा दिवसांचा अवधी शिल्लक असताना सहकारी संस्थाने अद्यापही गाेदामाची व्यवस्था केली नाही, असा सवाल शेतकरी करीत आहेत. या कारणामुळे धान विक्री करण्याची समस्या निर्माण झाली आहे. मागील आठ दिवसांपासून वडधा येथील धान्य खरेदी केंद्र एका खाजगी गाेदामामध्ये सुरू होण्याची चर्चा सुरू होती, मात्र अद्यापही त्यावर तोडगा न निघाल्याने खरेदी ठप्प पडली. परिसरातील अनेक टाेकनधारक शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. खरेदी-विक्री सहकारी संस्थेने बाहेर असलेल्या धानाची विल्हेवाट लावण्यासाठी तत्काळ गाेदामाची व्यवस्था करून शेतकऱ्यांचे धान खरेदी करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.