पाेलीस पाटलांनी जबाबदारीचे पालन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:34 AM2021-02-07T04:34:41+5:302021-02-07T04:34:41+5:30
गडचिराेली : गावपातळीवर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम पाेलीस पाटील करतात. पाेलीस व महसूल प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून ...
गडचिराेली : गावपातळीवर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम पाेलीस पाटील करतात. पाेलीस व महसूल प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून त्यांचे काम उल्लेखनीय असते. त्यामुळे गावात सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पाेलीस पाटलांनी आपले कर्तव्य व जबाबदारीचे प्रामाणिकपणे पालन करावे, असे प्रतिपादन देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांनी केले. आरमाेरी तालुक्यातील देलाेडा खुर्द येथे सेवानिवृत्त पाेलीस पाटलांच्या सत्कार साेहळ्यात शुक्रवारी ते अध्यक्षस्थानाहून बाेलत हाेते. कार्यक्रमाला आरमाेरीचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट, संवर्ग विकास अधिकारी चेतन हिवंज, पाेलीस उपनिरीक्षक कांचन उईके उपस्थित हाेते. याप्रसंगी तहसीलदार डहाट म्हणाले, कमी मानधन असतानाही पाेलीस पाटील उत्तम सेवा देतात. मानधनापेक्षा पद माेठे आहे, ही जाणीव ठेवून प्रशासनाला सहकार्य करण्याची भावना पाेलीस पाटलांनी मनात ठेवावी. कार्यक्रमात बीडीओ हिवंज यांनीही मार्गदर्शन केले. दरम्यान, सेवानिवृत्त पाेलीस पाटलांच्या सेवाकाळाचा गाैरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. त्यानंतर देविपूरचे सेवानिवृत्त पाेलीस पाटील प्रशांत गाईन व वघाळाचे सेवानिवृत्त पाेलीस पाटील हरिहर खरकाटे यांचा शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन व आभार डी. एम. राऊत यांनी केले. यावेळी पाेलीस हवालदार जीवन शेंडे, सूर्यवंशी, ग्रामसेवक राऊत, तलाठी धात्रक, पाेलीस पाटील टिकाराम लाकडे, शंकर जवादे, पंढरी ठाकूर, गाेरख भानारकर, अश्विनी मेश्राम, सागर खेवले, राऊत, कीर्ती समर्थ, किशाेर हुलके, माेंगरकर, निवाण लाजुरकर आदींसह गावातील नागरिक उपस्थित हाेते.