‘सीआरपीएफ’चे कमांडंट पंढरीनाथ यांनी साधला ग्रामस्थाशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:35 AM2021-08-29T04:35:06+5:302021-08-29T04:35:06+5:30

केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कमांडंट जी. डी. पंढरीनाथ यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत केंद्र शासनाद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसंबंधित माहिती ...

Pandharinath, Commandant, CRPF, interacted with the villagers | ‘सीआरपीएफ’चे कमांडंट पंढरीनाथ यांनी साधला ग्रामस्थाशी संवाद

‘सीआरपीएफ’चे कमांडंट पंढरीनाथ यांनी साधला ग्रामस्थाशी संवाद

Next

केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कमांडंट जी. डी. पंढरीनाथ यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत केंद्र शासनाद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसंबंधित माहिती दिली. ग्रामस्थांकडून समस्या जाणून घेतल्या व त्या समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले. गावातील मुलामुलींना नाेकरीसाठी व स्पर्धा परीक्षांसाठी आपण केव्हाही मार्गदर्शन करू शकतो, यासाठी अधिकारी वर्ग नेहमी तयार आहे, असे पंढरीनाथ यांनी सांगितले. याप्रसंगी लहान मुलांकरिता गरजू लोकांना ब्लॅकेट आणि विद्यार्थी व लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. सीआरपीएफचे निरीक्षक अजित फळतरे व एसआरपीएफचे उपनिरीक्षक बाबासाहेब रेंगे उपस्थित होते.

या ग्रामभेटीमध्ये पोवणी गावातील पाेलीस पााटील देवनाथ किरंगे, ग्रामसभेचे अध्यक्ष सुधाकर उसेंडी यांच्यासह गावातील नागरिक व आजूबाजूच्या गावांतील नागरिकांनी सहभाग घेतला.

280821\img-20210827-wa0012.jpg

सीआरपीएफ च्या कमांडन्ट नि साधला ग्रामस्थाशी संवाद

Web Title: Pandharinath, Commandant, CRPF, interacted with the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.