वारकऱ्यांसह एसटीलाही पंढरीची ओढ, सलग दुसऱ्या वर्षीही लाखाेंचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:25 AM2021-07-20T04:25:03+5:302021-07-20T04:25:03+5:30
गडचिराेली जिल्ह्यापासून पंढरपूरचे अंतर बरेच अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यातून स्वतंत्र वारी जात नाही. मात्र, काही नागरिक पंढरपूरला जातात. जिल्हाभरातील ...
गडचिराेली जिल्ह्यापासून पंढरपूरचे अंतर बरेच अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यातून स्वतंत्र वारी जात नाही. मात्र, काही नागरिक पंढरपूरला जातात. जिल्हाभरातील भाविकांची ही संख्या निश्चितच शेकडाेच्या घरात आहे. वारकरी नसल्याने गडचिराेली किंवा अहेरी आगारातून स्वतंत्र बसही साेडली जात नाही. मात्र, या दाेन्ही आगारांतील जवळपास १० बसेस मागविल्या जात हाेत्या. या बसेस मुख्यत्वे यवतमाळ, अमरावती किंवा बुलाडाणा जिल्ह्यातील बस आगारांमध्ये पाठविल्या जात हाेत्या. तेथून त्या पंढरपूरसाठी साेडल्या जात हाेत्या. या माध्यमातून आठ दिवसांत लाखाे रुपयांचे उत्पन्न मिळत हाेते. यावर्षी एसटीला या उत्पन्नापासून वंचित राहावे लागत आहे.
बाॅक्स
विठ्ठलाच्या भक्तांचा हिरमाेड
दरवर्षी शेकडाे विठ्ठल भक्त आषाढ महिन्यातील पंढरपूरच्या जत्रेला जात हाेते. मागील दाेन वर्षांपासून यात्रेला जाता येत नसल्याने त्यांचा हिरमाेड झाला आहे. घरीच बसून विठ्ठलाची आरती व पूजा करावी लागत आहे.
बाॅक्स
यवतमाळ, बुलडाणा जिल्ह्यांत पाठविल्या जात हाेत्या बसेस
गडचिराेली जिल्ह्यातून थेट पंढरपूरला एकही वारी जात नाही. त्यामुळे स्वतंत्र बसेस साेडली जात नाही. मात्र, पंढरपूरच्या यात्रेच्या कालावधीत यवतमाळ, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये जवळपास १० बसेस पाठविल्या जात हाेत्या. आठ दिवसांतून लाखाे रुपयांचे उत्पन्न मिळत हाेते.
बाॅक्स
१०
बसेस दरवर्षी दुसऱ्या जिल्ह्यात पाठविल्या जात हाेत्या
१५,००,०००
रुपये उत्पन्न मिळायचे