पपश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:36 AM2021-05-23T04:36:50+5:302021-05-23T04:36:50+5:30
गडचिराेली: यांत्रिकीकरणामुळे शेती कसण्यासाठी बैलांची आवश्यकता राहिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पशुधन कसायाला विकले आहे. पुर्वीच्या तुलनेत केवळ २० टक्के ...
गडचिराेली: यांत्रिकीकरणामुळे शेती कसण्यासाठी बैलांची आवश्यकता राहिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पशुधन कसायाला विकले आहे. पुर्वीच्या तुलनेत केवळ २० टक्के पशुधन शिल्लक आहे. पशुधनच नसल्याने ग्रामीण भागातील सेंद्रीय खताचेही प्रमाण कमी झाले आहे. कृषी विभाग सेंद्रीय शेती करण्याचे आवाहन करीत असले तरी हा खतच मिळणे कठीण झाले आहे.
शेतकऱ्यांना लागले पावसाचे वेध
गडचिराेली: २५ मे पासून राेहिणी नक्षत्राला सुरूवात हाेणार आहे. गडचिराेली जिल्ह्यात जुनच्या पहिल्या आठवड्यातच पाऊस पडते. यावर्षीही याच कालावधीत पाऊस पडावा अशी आशा शेतकरी करीत आहेत. वेळेवर पाऊस पडल्यास उत्पादनात वाढ हाेण्यास मदत हाेते. खरीपपूर्व मशागतीची कामे आता आटाेपत आली आहेत.
दुर्गम भागात तेंदूपत्ता संकलनाची लगबग
गडचिराेली: ग्रामीण व दुर्गम भागात आता तेंदूपत्ता संकलनाची लगबग वाढली आहे. आणखी आठ दिवस संकलनाचे काम चालणार आहे. या कालावधीत जास्तीत जास्त तेंदूपत्ता संकलन व्हावे यासाठी मजूर प्रयत्न करीत आहेत. काही भागात अधूनमधून पाऊस पडत असल्याने संकलनाच्या कामात व्यत्यय येत आहे.
उसेगावजळील पुलाची उंची वाढवा
गडचिराेली: तालुक्यातील उसेगावाजवळून कठाणी नदी वाहते. विश्रामपूर ते आंबेशिवणी या गावादरम्यानच्या रस्त्यावर हे पूल आहे. हा रस्ता पुढे गीलगाव, अमिर्झा परिसरातील अनेक गावांना जाेडते. या मार्गावरील उसेगावजवळील कठाणी नदीवरचा पूल कमी उंचीचा व अरूंद आहे. त्यामुळे पावसाळ्यात अनेकवेळा या पूलावरून पाणी वाहत राहते. या पुलाची उंची वाढविणे आवश्यक झाले आहे.