काेराेनाची लस घेण्यात आशा वर्करसह पॅरामेडिकल स्टाफ आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:37 AM2021-02-10T04:37:14+5:302021-02-10T04:37:14+5:30
गडचिराेली जिल्ह्याला एकूण १८ हजार काेराेना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाल्या आहेत. १६ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या कालावधीत ...
गडचिराेली जिल्ह्याला एकूण १८ हजार काेराेना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाल्या आहेत. १६ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या कालावधीत आराेग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याला प्राधान्य देण्यात आले हाेते. ३ फेब्रुवारीपासून महसूल विभाग, पाेलीस, सीआरपीएफ आदी कर्मचाऱ्यांनाही लस दिली जात आहे. जिल्ह्यात १० हजार १६६ आराेग्य कर्मचारी व १० हजार २८५ इतर विभागांचे कर्मचारी, अशा एकूण २० हजार ४५१ कर्मचाऱ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. ८ फेब्रुवारीपर्यंत एकूण ६ हजार ३५ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. त्यामध्ये ५ हजार १५३ आराेग्य कर्मचारी व ८८२ पाेलिसांसह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सुरुवातीच्या कालावधीत कर्मचारी लस घेण्यास थाेडे भीत हाेते. मात्र, या लसीचे काेणतेही दुष्परिणाम नसल्याचे लक्षात आल्यानंतर कर्मचारी स्वत:हून लस घेण्यास पुढे येत असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक तालुक्यात १ याप्रमाणे १२ तालुक्यात १२ लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. दरदिवशी ७०० ते ८०० कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे.
बाॅक्स
पाेलीस व महसूल कर्मचाऱ्यांचेही लसीकरण सुरू
३ फेब्रुवारीपासून महसूल, पाेलीस, सीआरपीएफ यांना लसीकरण देण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात एकूण १० हजार २८५ इतर विभागांचे कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांची नाेंदणीसुद्धा आराेग्य विभागाच्या काेविड ॲपवर झाली आहे.
डाॅक्टर ३४४
परिचारिका ७०६
आशा, अंगणवाडीसेविका, पॅरामेडिकल स्टाफ व ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ ४,१०३
पाेलीस ८८२
जिल्ह्याचे लसीकरणाचे लक्ष २०,४५१
प्रत्यक्ष लसीकरण ६,०३५
लसीकरणाच्या प्रतीक्षेत १४,४१६