स्वच्छता अभियानात पारडीकुपी राज्यस्तरीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:25 AM2021-07-02T04:25:35+5:302021-07-02T04:25:35+5:30

स्वच्छ ग्राम स्पर्धा २०१७-१८चा राज्यस्तरीय विशेष पुरस्कार पारडीकुपी ग्रामपंचायतीला देण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत पार ...

Pardikupi State Level Award in Sanitation Campaign | स्वच्छता अभियानात पारडीकुपी राज्यस्तरीय पुरस्कार

स्वच्छता अभियानात पारडीकुपी राज्यस्तरीय पुरस्कार

Next

स्वच्छ ग्राम स्पर्धा २०१७-१८चा राज्यस्तरीय विशेष पुरस्कार पारडीकुपी ग्रामपंचायतीला देण्यात आला.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी

दीपक सिंगला यांच्या हस्ते सदर पुरस्कार ग्रामपंचायतीला देण्यात आला. स्व. आबासाहेब खेडकर स्मृती पुरस्कार या नावाने हा पुरस्कार देण्यात येतो. प्रशस्तीपत्रक व तीन लाख रुपये बक्षीस स्वरुपात पारडीकुपी ग्रामपंचायतीला देण्यात आले.

सदर पुरस्कार ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच संजय निखारे, सचिव किशोर कुळसंगे, गटविकास अधिकारी

मुकेश माहोर यांनी स्वीकारला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माणिक चव्हाण, गडचिरोली पंचायत समिती सभापती मारोतराव इचोडकर उपस्थित होते.

पारडीकुपी ग्रामपंचायतीने स्वच्छतेच्या क्षेत्रात गेल्या पाच वर्षात जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर नेण्यात महत्वाचे योगदान दिले आहे. गावातील स्वच्छता, हागणदारी मुक्ती, जलसंधारण अशा विविध

विषयांत विविध पुरस्कार पटकावले आहेत. तसेच गावाने स्मार्ट व्हिलेज म्हणूनही पुरस्कार या अगोदर पटकावला आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यात प्रथम आल्यानंतर नागपूर विभागात द्वितीय क्रमांक पटकाविला, तर आता राज्यस्तरावर विशेष पुरस्कार पटकावण्यात यश मिळविले.

काेट

गडचिरोली जिल्ह्यात आमच्या ग्रामपंचायतीने स्वच्छतेसह इतर अनेक विषयात खूप काम केले आहे. अनेक

पुरस्कार ग्रामपंचायतीला मिळाले आहेत. आताही मिळालेला पुरस्कार खऱ्या अर्थाने माझ्या गावातील प्रत्येक नागरिकाने केलेल्या कामाचे फलित आहे.

- संजय निखारे, सरपंच, पारडीकुपी.

Web Title: Pardikupi State Level Award in Sanitation Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.