लांब पल्ल्याच्या बसेसला प्रवाशांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:47 AM2021-06-16T04:47:51+5:302021-06-16T04:47:51+5:30
गडचिराेली : जिल्हाबंदी हटविल्यानंतर गडचिराेली आगारातून लांब पल्ल्याच्या बसेस साेडल्या जात आहेत. या बसेसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...
गडचिराेली : जिल्हाबंदी हटविल्यानंतर गडचिराेली आगारातून लांब पल्ल्याच्या बसेस साेडल्या जात आहेत. या बसेसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरासरी ५५ एवढे भारमान मिळत आहे. प्रत्येक दिवशी बसफेऱ्या वाढविण्याचा प्रयत्न एसटीकडून केला जात आहे. जिल्हाबंदीच्या सीमा कायम असताना जिल्ह्यातच बसफेऱ्या साेडल्या जात हाेत्या. मात्र बाजारपेठ बंद असल्याने फारसे प्रवासी मिळत नव्हते. त्यामुळे देसाईगंज, आरमाेरी, अहेरी यासारख्या प्रमुख मार्गांवर दिवसाला एक ते दाेन फेऱ्या साेडल्या जात हाेत्या. त्यांनाही प्रवासी मिळत नव्हते. ७ जूनपासून शासनाने जिल्हाबंदीच्या सीमा शिथिल केल्या. त्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यात बसेस साेडण्यास सुरुवात झाली. सद्यस्थितीत गडचिराेली आगारातून नांदेड, अमरावती, उमरखेड, नागपूर, चंद्रपूर, भामरागड, आसरअल्ली, लाहेरी, सिराेंचा आदी ठिकाणी बसेस साेडल्या जात आहेत.
बाॅक्स
चंद्रपूर, नागपूरसाठी गर्दी
- चंद्रपूर व नागपूरसाठी साेडल्या जाणाऱ्या बसेस एसटीसाठी नेहमीच फायद्याच्या ठरल्या आहेत. आताही या दाेन मार्गावर चांगले प्रवासी मिळत असल्याने दर अर्ध्या तासाने बस साेडली जात आहे.
- अमरावती, नांदेड, उमरखेड या मार्गांवरही बसेस साेडल्या जात आहेत. लाॅकडाऊनच्या कालावधीत नागरिकांनी कामे थांबविली हाेती. जिल्हाबंदी उठताच आता नागरिक नातेवाईकांकडे भेटण्यासाठी जात आहेत. त्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यात जाणाऱ्या बसेसला प्रतिसाद मिळत आहे.
खासगी वाहतूक सेवा बंद
खासगी बस वाहतूक हा एसटीचा सर्वात माेठा स्पर्धक आहे. मूल-चंद्रपूर मार्गावर काही खासगी बसेस सुरू झाल्या आहेत. मात्र नागपूर मार्गावरच्या बसेस अजूनही सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे या मार्गावरचे पूर्ण प्रवासी एसटीला मिळत आहेत. मूल मार्गावरही खासगी बसेससाेबतच काही खासगी वाहने धावतात. मात्र ही वाहनेसुद्धा बंद असल्याने एसटीला चांगले प्रवासी मिळत आहेत. दाेन महिन्यापासून बससेवा बंद असल्याने एसटीला फार माेठे नुकसान सहन करावे लागले आहे. सध्याच्या स्थितीचा फायदा उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
काेट
सध्या बसेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे दरदिवशी बसफेऱ्या वाढविण्याचा प्रयत्न एसटीमार्फत केला जात आहे. दरदिवशी १२ हजार किमीचा प्रवास एसटी करीत असून, त्यातून अडीच लाख रुपयाचे उत्पन्न मिळत आहे. चांगले उत्पन्न मिळवून एसटीची स्थिती सुधारण्याची संधी एसटी कर्मचाऱ्यांना मिळाली आहे.
- मंगेश पांडे, आगार प्रमुख, गडचिराेली
जिल्ह्यात सध्या एसटीच्या किती फेऱ्या सुरू आहेत? - २४
वाहक - १७०
चालक - २०४
एकूण बसेस १०३