उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर प्रवासी वाहन आदळले, एक ठार; चार जखमी
By मनोज ताजने | Updated: January 28, 2023 10:00 IST2023-01-28T09:59:29+5:302023-01-28T10:00:24+5:30
जखमी झालेल्या ४ इसमांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येथे हलविण्यात आले.

उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर प्रवासी वाहन आदळले, एक ठार; चार जखमी
सिरोंचा : रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला टाटा मॅजिक या प्रवासी वाहनाने जोरदार धडक दिल्याने एक जण ठार तर चौघे गंभीर जखमी झाले. हा अपघात सिरोंचापासून ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या लांबडपल्ली या गावाजवळ आज (शनिवारी) सकाळी ७ वाजताच्या सुमारास झाला.
जखमी झालेल्या ४ इसमांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येथे हलविण्यात आले. सदर गाडी सोमनूरची असल्याचे सांगितले जात आहे. सिरोंचा ते असरअल्ली महामार्गाचे काम काही दिवसांपासून बंद आहे. परंतु कामावर चालणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉली बेजबाबदारपणे रस्त्यावर उभ्या करून ठेवतात. रस्त्याचे डांबरीकरण अर्धवट करून सोडून दिलेले आहे. यातच वेगाने येत असलेल्या टाटा मॅजिकला उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अंदाज आला नाही आणि हा अपघात झाला. यात धडक देणाऱ्या वाहनाचा समोरील भाग चेंदामेंदा झाला. तपास उपनिरीक्षक श्रीकिशन कांदे करीत आहे.