कुनघाडा फाट्यावर प्रवाशी भिजतात पावसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:40 AM2021-08-28T04:40:34+5:302021-08-28T04:40:34+5:30
काही वर्षांपूर्वी आमदार स्थानिक विकास निधीतून कुनघाडा (रै.) फाट्यावर प्रवासी निवारा उभारण्यात आला. चुकीच्या जागेवर निवाऱ्याचे बांधकाम करण्यात आल्याने ...
काही वर्षांपूर्वी आमदार स्थानिक विकास निधीतून कुनघाडा (रै.) फाट्यावर प्रवासी निवारा उभारण्यात आला. चुकीच्या जागेवर निवाऱ्याचे बांधकाम करण्यात आल्याने गडचिराेलीवरून चामाेर्शीमार्गे येणारी वाहने प्रवाशांना दिसत नव्हती. वादळ वाऱ्यामुळे अल्पावधीतच निवाऱ्याची दुरवस्था झाली. सध्या प्रवाशांना उन्हात उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. कुनघाडा (रै.) हे गाव लोकसंख्या व विस्ताराने बरेच मोठे आहे. परिसरात अनेक खेड्यांचा समावेश आहे. मात्र सदर गाव चामोर्शी-गडचिरोली महामार्गावरून पूर्वेस ३ किमी अंतरावर आतमध्ये वसले असल्यामुळे महामार्गावरून बसेस पकडण्यासाठी कुनघाडा (रै.) फाट्यावर जावे लागते.
चामोर्शीमार्गे कुनघाडाकडे येणारी कुठलीच बस उपलब्ध नाही. गडचिरोलीवरून गिलगाव-पोटेगाव व माल्लेरमाल बसफेरी दिवसातून दोनवेळा सुरू आहे. परिसरातील नागरिकांना तालुका व जिल्हा मुख्यालयात जाण्यासाठी कुनघाडा फाट्यावर जाऊन बस पकडावी लागते. फाट्यावर पुरेशा बसेस थांबत नसल्यामुळे प्रवाशांना ताटकळत राहावे लागते. प्रवाशांच्या साेयीसाठी येथे नवीन निवारा बांधावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.