खिचडी तपासणीचा अहवाल अप्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:05 AM2018-02-01T00:05:30+5:302018-02-01T00:07:42+5:30

तालुक्यातील खरपुंडी येथील जि.प. प्राथमिक शाळेतील ३६ मुलांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.

 Patch verification report uncovered | खिचडी तपासणीचा अहवाल अप्राप्त

खिचडी तपासणीचा अहवाल अप्राप्त

Next
ठळक मुद्दे कुलूप ठोकणार : खराब झालेला जुना माल परत केल्याने वाढला संशय

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तालुक्यातील खरपुंडी येथील जि.प. प्राथमिक शाळेतील ३६ मुलांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. या घटनेला १० दिवसांचा कालावधी उलटला तरी खिचडी नमुन्याचा तपासणी अहवाल अद्यापही प्राप्त झाला नाही. याशिवाय २२ जानेवारीला या शाळेतील खराब झालेला जुना तांदूळ व वाटाणा संबंधित कंत्राटदाराला परत पाठविण्यात आला आहे, त्यामुळे खिचडीतूनच विद्यार्थ्यांची प्रकृती ढासळली असावी, असा ग्रामस्थांचा संशय वाढला. त्यामुळे येत्या ५ फेब्रुवारीपर्यंत खिचडी तपासणीचा अहवाल द्यावा, अन्यथा ६ फेब्रुवारीला शाळेला कुलूप ठोकणार, असा इशारा ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांसह पालकांनी पत्रपरिषदेतून दिला आहे.
यावेळी सरपंच दादाजी नैताम, उपसरपंच कमलेश खोब्रागडे, ग्रा.पं. सदस्य वाल्मिक वासेकर यांच्यासह वसंत जुआरे, घनश्याम भुसारी, पंकज बारसिंगे, प्रकाश दर्रो, हिराजी नैताम आदी पालक उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिन सोहळ्यानंतर २७ जानेवारीपासून खरपुंडीची जि.प. शाळा बंद आहे. १९ जानेवारीला ३६ विद्यार्थ्यांना भरती करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच १८ जानेवारीला काही मुलांची प्रकृती ढासळली होती, असे पदाधिकाºयांनी सांगितले.

आम्ही प्रत्यक्ष खरपुंडी जि.प. शाळेला भेट देऊन तेथील खिचडीचे नमूने घेतले. या नमुन्यांची आरोग्य विभागाकडून तपासणी होत नाही. त्यामुळे हे नमूने अन्न व औैषण प्रशासनाकडे सोपविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी हे नमुने स्वीकारले नाही. नमुने घेणे हे आमचेच काम आहे, असे सांगून त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्हीच तेथे जाऊन नमुने घेऊ असे सांगितले. मात्र कुणीही तिथे जाऊन नमुने घेतले नाही. त्यामुळे खिचडी नमुन्याची तपासणी झाली नाही. पण विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या.
- डॉ. शशिकांत शंभरकर, डीएचओ, गडचिरोली

Web Title:  Patch verification report uncovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.