पाथरगोटावासीयांचा निवडणुकीवर बहिष्कार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 06:00 AM2020-03-13T06:00:00+5:302020-03-13T06:00:35+5:30

पाथरगोटा हे गाव पळसगाव ग्रामपंचायतअंतर्गत येते. पाथरगोटा गावातून सहा सदस्य निवडून दिले जातात. पळसगाव ग्रामपंचायत पेसा अंतर्गत येते. पाथरगोटा गावात एकही अनुसूचित जमातीचे कुटुंब नाही. तरीही ग्रामपंचायत पेसा अंतर्गत येत असल्याने दरवर्षी अनुसूचित जमातीचाच सरपंच बनते. हा पाथरगोटावासीयांवर अन्याय आहे. पेसा अंतर्गत प्राप्त झालेला निधी केवळ अनुसूचित जमाती असलेल्या प्रभागात म्हणजे पळसगाव येथेच खर्च केला जाते.

Pathargotas boycott on election? | पाथरगोटावासीयांचा निवडणुकीवर बहिष्कार?

पाथरगोटावासीयांचा निवडणुकीवर बहिष्कार?

Next
ठळक मुद्देविकास कामांमध्ये अन्याय : २५ वर्षांपासून पाठपुरावा; स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी/जोगीसाखरा : आरमोरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पाथरगोटा येथील गावकऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार, गटविकास अधिकारी यांचेमार्फत शासनाला पाठविले आहे.
पाथरगोटा हे गाव पळसगाव ग्रामपंचायतअंतर्गत येते. पाथरगोटा गावातून सहा सदस्य निवडून दिले जातात. पळसगाव ग्रामपंचायत पेसा अंतर्गत येते. पाथरगोटा गावात एकही अनुसूचित जमातीचे कुटुंब नाही. तरीही ग्रामपंचायत पेसा अंतर्गत येत असल्याने दरवर्षी अनुसूचित जमातीचाच सरपंच बनते. हा पाथरगोटावासीयांवर अन्याय आहे. पेसा अंतर्गत प्राप्त झालेला निधी केवळ अनुसूचित जमाती असलेल्या प्रभागात म्हणजे पळसगाव येथेच खर्च केला जाते. त्यामुळे दोन गावांमध्ये अधूनमधून वाद निर्माण होते. ग्रामपंचायतीला प्राप्त होणाºया निधीचे दोन्ही गावांना समान वितरण होणे आवश्यक आहे. मात्र पाथरगोटा गावावर नेहमीच अन्याय केला जाते. पाथरगोटा गावात अजूनही रस्ते, नाल्या, पिण्याचे पाणी आदी सुविधांचा अभाव आहे. पाथरगोटा हे मोठे गाव आहे. येथील नागरिकांना प्रत्येक कामासाठी तीन किमीची पायपीट करीत पळसगाव येथे जावे लागते.
२५ वर्षांपूर्वी पाथरगोटाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा, असा ठराव ग्रामसभेने घेऊन तो शासनाकडे पाठविला. मात्र याची दखल घेण्यात आली नाही. पळसगाव गटग्रामपंचायतीत राहून पाथरगोटाचा विकास होणे अशक्य आहे. त्यामुळे २९ मार्च रोजी ग्रामपंचायतसाठी होणाºया मतदानावर सर्व गावकरी बहिष्कार टाकतील, असे ठरविण्यात आले आहे.
गावात सभा घेऊन हा निर्णय घेण्यात आला. गावात स्वाक्षरी अभियान राबविले जात असून गावकऱ्यांच्या स्वाक्षºयांचे निवेदन शासनाला पाठविले जाणार आहे.

Web Title: Pathargotas boycott on election?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.