रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 05:00 AM2020-12-03T05:00:00+5:302020-12-03T05:00:16+5:30

  लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : हिवाळ्यात थंडीमुळे काेराेनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता हाेती. शिवाय अनलाॅक झाल्यापासून नागरिकही काही ...

The patient's recovery rate increased | रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण वाढले

रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण वाढले

Next
ठळक मुद्देनवीन ४२ काेराेनाबाधितांची भर : सद्यस्थितीत ५१० रुग्ण शिल्लक

  लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : हिवाळ्यात थंडीमुळे काेराेनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता हाेती. शिवाय अनलाॅक झाल्यापासून नागरिकही काही प्रमाणात बिनधास्त झाले. मात्र आता नवीन काेराेनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. काेराेना रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण वाढत आहे. बुधवारी गडचिराेली जिल्ह्यात नवीन ४२  बाधितांची भर पडली असून दिवसभरात ७४ जणांनी काेराेनावर मात  केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. 
जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित ८ हजार ४१ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ७ हजार ४४८ वर पोहचली. तसेच सध्या ५१० क्रियाशील कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ८३ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील काेरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.६३ टक्के, क्रियाशील रूग्णांचे प्रमाण ६.३४ टक्के तर मृत्यू दर १.०३ टक्के झाला. 
नवीन ४२ बाधितामध्ये गडचिरोली १५, अहेरी ५, आरमोरी ४, चामोर्शी  ८, धानोरा १, एटापल्ली २, कुरखेडा २, मुलचेरा १, देसाईगंज येथील ४ जणांचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या ७४ रूग्णांमध्ये गडचिरोली ३७, अहेरी ४, आरमोरी १८, भामरागड १, चामोर्शी २, धानोरा १, एटापल्ली ५, मुलचेरा २, कोरची १,  कुरखेडा ३ जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील इंदिरा नगर १, रामनगर १,  आंबेडकर वार्ड १, नवेगाव ३, इंदाळा १, साई नगर १,  सीआरपीएफ २,  कलेक्टर कॉलनी १, कारगीर चौक १, पोलीस कॉलनी १, विसापूर १, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये  स्थानिक २, आलापल्ली १, नागेपल्ली १, महागाव १, आरमोरी तालुक्यातील बाधितांमध्ये  देलोडा १, स्थानिक २, देऊळगाव १, चामोर्शी तालुक्यातील बाधितांमध्ये  बहादुरपुर १, भाडभीडी १, जयनगर १, स्थानिक २,  आष्टी २,  इल्लूर पेपरमिल १,  धानोरा तालुक्यातील बाधितांमध्ये शासकीय आश्रम शाळा १, एटापल्ली तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक १, आष्टी १, कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये कडोली १, धानेगाव १, मुलचेरा तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक १, देसाईगंज तालुक्यातील बाधितांमध्ये  शिवाजी वाॅर्ड २,  भगतसिंग वाॅर्ड १, गिरोला १ जणाचा समावेश आहे.
बाजारपेठेत नागरिक बनले बिनधास्त
काेराेना संदर्भात राज्य सरकारने अनलाॅक केल्यानंतर शहरी व ग्रामीण भागातील नागरिक नियमाबाबत बिनधास्त झाले आहेत. गडचिराेली येथील आठवडी बाजार व बाजारपेठेत बरेच नागरिक तसेच काही विक्रेते मास्कच्या वापराला पाठ दाखवित असल्याचे दिसून येते. दैनंदिन गुजरी बाजारातही विक्रेते व ग्राहकांमध्ये मास्कचा वापर पूर्वीसारखा आता दिसून येत नाही. काही माेजकेच लाेक मास्क लावून असल्याचे दिसतात.

Web Title: The patient's recovery rate increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.