पांदण व नहराचे रस्ते झाले चिखलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:37 AM2021-07-28T04:37:46+5:302021-07-28T04:37:46+5:30
तालुक्यातील अनेक गावातील शेताकडे जाणाऱ्या रस्त्यांचे खडीकरण करण्याची मागणी अनेकदा नागरिकांच्या वतीने करण्यात आली. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात ...
तालुक्यातील अनेक गावातील शेताकडे जाणाऱ्या रस्त्यांचे खडीकरण करण्याची मागणी अनेकदा नागरिकांच्या वतीने करण्यात आली. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. गेल्या पाच वर्षांपासून नागरिकांचे केवळ हेलपाटे सुरू आहेत. आजच्या स्थितीत रस्त्यावर चिखल पसरून शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. शेतकरी कसाबसा मार्ग काढून ये-जा करीत आहेत. याच रस्त्यावर मातीकाम करण्यात आले. परंतु अनेक वर्षे लोटूनही यावर्षी या रस्त्याच्या दुरुस्तीकडे व खडीकरण करण्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. पांदन रस्त्याचे खडीकरण करण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.
चामोर्शी येथील जुवारे यांच्या घरापासून जाणाऱ्या जुन्या कुरमार रस्त्यावर चिखल पसरला आहे. जुवारे यांच्या घराच्या काॅर्नरपासून जाणाऱ्या नहराच्या पाटाच्या पाळीवर मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. मुस्लिम कब्रस्थानपासून जुन्या चाकलपेठ रस्त्यावर चिखल पडल्याने शेकऱ्यांना शेतावर येणे - जाणे करण्यास अनेक वर्षांपासून कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
260721\4150img-20210725-wa0189.jpg
चिखलमय झालेले पांदन महराईचे रस्ते फोटो