खडीकरणामुळे काेर्लामालचा रस्ता पातागुडमला जाेडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:27 AM2021-06-02T04:27:34+5:302021-06-02T04:27:34+5:30
काेर्लामाल येथील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर जिल्हा वार्षिक योजनेतून या रस्त्याच्या खडीकरणासाठी ४५ लाख रुपये मंजूर झाले. नक्षल्यांचा बालेकिल्ला ...
काेर्लामाल येथील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर जिल्हा वार्षिक योजनेतून या रस्त्याच्या खडीकरणासाठी ४५ लाख रुपये मंजूर झाले. नक्षल्यांचा बालेकिल्ला व अविकसित क्षेत्र असलेल्या कोर्लामाल या गावाला भेट देणारे अजय कंकडालवार हे पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष ठरले. रस्त्याचे भूमिपूजनानंतर जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी येथील ग्रामस्थांशी स्थानिक गोंडी व माडिया भाषेतूनच संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दौऱ्यात जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी कोर्ला मालसह कोपेला, रमेशगुडम, किष्टय्यापल्ली आदी गावांना भेटी देत तेथील समस्या जाणून घेत सर्व समस्यांचे निराकरण करण्याची त्यांनी ग्वाही दिली.
कोर्लामाल येथील रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी आविस तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम, आविसचे ज्येष्ठ नेते मंदा शंकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आकुला मल्लिकार्जुनराव, कोर्लामालचे सरपंच गणपत वेलादी, जि.प.सदस्य सरिता तैनेनी, आविसं सल्लागार रवी सल्लम, बामणीचे सरपंच अजय आत्राम, आसरअल्लीचे सरपंच रमेश मेकला, बांधकाम विभागाचे उपअभियंता नानाजी मसे, अंकुलू जनगाम, सत्यम बेल्लमकोंडा, विजय रेपालवार, श्रीनिवास दुर्गम, वासू सपाट, साई मंदा, प्रशांत गोडशेलवार, राकेश अल्लूरवार यांच्यासह नागरिक उपस्थित हाेते.