अभ्यासासाेबतच खेळांकडेही लक्ष द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:37 AM2021-02-24T04:37:47+5:302021-02-24T04:37:47+5:30
कोरची परिसरातील गोरगरीब जनतेस मोफत आरोग्य उपचार तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती मिळावी तसेच योजनांचा लाभ मिळावा यासाठी ...
कोरची परिसरातील गोरगरीब जनतेस मोफत आरोग्य उपचार तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती मिळावी तसेच योजनांचा लाभ मिळावा यासाठी गुरुवारला पोलीस स्टेशन कोरचीच्या मैदानात जनजागरण आरोग्य मेळाव्याचा कार्यक्रम संपन्न झाला. मेळाव्याचे उद्घाटन भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत हाेते.
अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक मोतीलाल मोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक महिला व बाल कार्यालयाचे विजय बुल्ले, कृषी अधिकारी अनंत बेलूरकर, पोलीस उपनिरीक्षक रवी मनोहर, समाधान फडोळ, आर. नरोटे, रुपेश भैसारे, प्रमोद सातपुते, अनिकेत भांडारकर एमटीएस, मुख्याध्यापक प्रभाकर दहिवले, राहुल अंबादे, के एस सहारे, के. जे. जुमनाके, के. जी. साहू उपस्थित होते.
या आरोग्य मेळाव्यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना उपस्थित मान्यवरांकडून इंदिरा आवास योजना,श्रावणबाळ योजना,जात प्रमाणपत्र वाटप, बालसंगोपन योजना माहिती, बस प्रवास सवलत माहिती, संजय गांधी निराधार योजना अशा विविध योजनांची माहिती डॉ. स्वप्नील राऊत, रुपेश भैसारे, विजय बुल्ले, समाधान फडोळ यांनी दिली. शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत शेतीविषयी माहिती देण्यात आली.
जिल्हा पोलीस व कोरची पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने कोरची येथे एक दिवसीय वीर बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धा व वीर बाबूराव शेडमाके कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये प्रथम बक्षीस ३ हजार, द्वितीय २ हजार,तृतीय १ हजार प्रमाणे देण्यात आले. यामध्ये कबड्डी स्पर्धेतील प्रथम विजेते जय गढ माता दी बोंडे यांना मिळाले तर द्वितीय हितकसा गावच्या समूहाला तर तृतीय कुंभकोट गावच्या समूहाला मिळाले. व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये प्रथम आलेल्या आयटीआय कोरची टीमला व्हॉलीबॉल किटसह तीन हजार रोख बक्षीस तहसीलदार सी. आर. भंडारी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले तर द्वितीय बक्षीस ऑल फ्रेंड्स ग्रुप कोरची, तृतीय मयालाघाट गावातील टीमला मिळाले. संचालन ठाकरे यांनी केले.