केंद्राप्रमाणे डॉक्टरांना वेतन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 11:28 PM2018-03-16T23:28:31+5:302018-03-16T23:28:31+5:30
महाराष्ट्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना केंद्र शासन व इतर राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणे वेतन व इतर भत्ते देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाकडे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : महाराष्ट्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना केंद्र शासन व इतर राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणे वेतन व इतर भत्ते देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाकडे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण भागात काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना राज्य शासनाच्या कोट्यातील ५० टक्के जागा पदव्युत्तर शिक्षणासाठी राखीव ठेवल्या जात होत्या. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागात सेवा देण्यासाठी तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध होत होते. ही संधी कायम ठेवावी, १९८६ च्या निर्णयानुसार केंद्र शासनातील वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणे समान वेतन व भत्ते देण्याची तरतूद असतानाही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वैद्यकीय अधिकारी यांच्यावर हल्ले होत आहेत. त्यामुळे सुरक्षा पुरवावी, एन.एम.सी. बिल अन्यायकारक आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देतेवेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुनील मडावी, डॉ. अमित साळवे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.