शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 05:00 AM2019-11-26T05:00:00+5:302019-11-26T05:00:59+5:30
मुलचेरा शिवसेना तालुका शाखेच्या वतीने सोमवारी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना शेतकºयांना करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुलचेरा : ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या अवकाळी पावसामुळे हाती आलेले पीक नष्ट झाले. वादळी पावसामुळे शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकºयांना त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.
मुलचेरा शिवसेना तालुका शाखेच्या वतीने सोमवारी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना शेतकºयांना करावा लागत आहे. अनेक शेतकरी सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना न्याय देणे आवश्यक आहे. प्रशासनाने सदर लाभार्थ्यांची नावे यादीत टाकून सन्मान योजनेचा लाभ द्यावा, केंद्र शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत निम्मी खर्च झाली नाही. त्यामुळे शिल्लक असलेला निधी शेतकऱ्यांना द्यावा. तसेच रोजगार हमी योजनेंतर्गत कामे सुरू करून त्वरित शेतकऱ्यांच्या हाताला काम द्यावे, कामे सुरू केल्यास रोजगारासाठी बाहेर स्थलांतर होणार नाही. अतिवृष्टीमुळे तसेच विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे बराचसा पैसा उपाययोजना करण्यात गेला. त्यामुळे सध्या रबी हंगामासाठी बी-बियाणे व खते खरेदी करण्याकरिता शेतकऱ्यांकडे पैसे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला काम द्यावे तसेच योग्य उपाययोजना कराव्या, पीक विम्याचे पैसे सरसकट शेतकऱ्यांना द्यावे, संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्यात यावा, तसेच हेक्टरी मदत न देता प्रति एकरी मदत द्यावी, तसेच शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांच्या स्थितीचा विचार करून त्वरित उपाययोजना प्रशासनस्तरावरून कराव्या, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश होता.
निवेदन देताना तालुका प्रमुख नीलकमल मंडल, शहर प्रमुख दिगंबर गावडे व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
धानोरा तहसील कार्यालयावर शिवसैनिकांची धडक
शिवसेना तालुका शाखा धानोराच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर धडक देऊन जिल्हाधिकाºयांच्या नावे २५ आॅक्टोबर रोजी सोमवारला निवेदन देण्यात आले. संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्यात यावा, विमा कंपन्यांनी विम्याची रक्कम शेतकºयांना त्वरित द्यावी, व्यापारी, सावकारी कर्ज माफ करावे, कृषिपंपाचे वीज बिल माफ करावे, शेतकऱ्यांच्या मुलाची फी माफ करावी, बँकांनी कर्जमाफी होईपर्यंत कर्ज वसुली थांबविण्यात यावी, विद्यार्थी व विद्यार्थिनींना त्यांच्या शाळेपर्यंतच्या प्रवासाची सुविधा मोफत करण्यात यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. सदर निवेदन तहसीलदार के.वाय.कुनारपवार यांनी स्वीकारले. यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोद्दार, सुनील पोरेड्डीवार, शिवसेना तालुका प्रमुख चंद्रशेखर उईके, नंदू कुमरे, वासुदेव शेडमाके, मुकेश बोडगेवार, नकूल बोरीकर, उमेश वड्डे, अनिकेत फलके, पुरूषोत्तम चिंचोलकर, प्रेम उंदीरवाडे, माहिन शेख, शोहेब शेख, प्रवीण बोडगेवार, देवराव मोगरकर, तुळशिदास कुकुडकर, प्रशांत धुडसे, विनोेद मेश्राम हजर होते.