वेतनात दिरंगाई होणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 12:43 AM2017-09-01T00:43:26+5:302017-09-01T00:43:46+5:30
जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल. भविष्य निर्वाह निधी हिशोबाच्या पावत्या शिक्षकांना देण्यात येईल, तसेच शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या एक तारखेला करण्यासाठी प्रयत्न करू,....
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल. भविष्य निर्वाह निधी हिशोबाच्या पावत्या शिक्षकांना देण्यात येईल, तसेच शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या एक तारखेला करण्यासाठी प्रयत्न करू, वेतन प्रक्रियेत दिरंगाई होणार नाही, असे आश्वासन शिक्षणाधिकारी (माध्य.) नानाजी आत्राम यांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिले.
शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या व प्रश्नांसंदर्भात विमाशिसंच्या पदाधिकाºयांनी २९ आॅगस्ट रोजी शिक्षणाधिकारी आत्राम यांची कार्यालयात जाऊन भेट घेतली. याप्रसंगी विमाशिसंचे सहकार्यवाह सुधाकर अडबाले, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, जिल्हा कार्यावाह अजय लोंढे, शेमदेव चापले हजर होते.