भामरागडात शांतता रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 12:20 AM2017-08-02T00:20:17+5:302017-08-02T00:21:16+5:30
पोलीस स्टेशन भामरागडच्या वतीने १ आॅगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता नक्षलविरोधी शांतता रॅली काढण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : पोलीस स्टेशन भामरागडच्या वतीने १ आॅगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता नक्षलविरोधी शांतता रॅली काढण्यात आली. या रॅलीत गावातील नागरिक तसेच शाळेतील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
भामरागड पोलीस स्टेशनमधून रॅलीला सुरुवात करून वीर बाबुराव चौक ते बाजार चौक येथून रॅली काढण्यात आली. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्येच रॅलीचा समारोप करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात रॅली काढण्यात आली. रॅलीच्या वेळी सीआरपीएफचे सहायक समादेशक जितेंद्र कुमार, पोलीस निरीक्षक सांगळे, सहायक पोलीस निरीक्षक अंजली राजपूत, पोलीस उपनिरीक्षक शेळके, बनकर, महागडे, राळेभात, बैसाने, मुजूमदार यांच्यासह सीआरपीएफ, एसआरपीएफ, पोलीस कर्मचारी सहभागी झाले.
मंगळवारी अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी असल्याने दोन्ही महापुरूषांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थी व नागरिकांनी नक्षलवादाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हिंसा करून आपली दहशत निर्माण करणे व त्यामाध्यमातून गोरगरीब जनतेवर आपले अधिराज्य प्रस्थापित करणे हा मुख्य उद्देश नक्षल्यांचा असल्याने त्यांना गावामध्ये थारा देऊ नये, त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवू नये, आजपर्यंत नक्षल्यांनी दुर्गम भागातील नागरिकांची फसवणूक करण्याचे काम केले आहे. लोकशाहीनेच विकास शक्य आहे, असे प्रतिपादन पोलीस अधिकाºयांनी केले.