पीक पेरणी १० टक्क्यांवर पोहोचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 10:59 PM2018-07-02T22:59:12+5:302018-07-02T22:59:37+5:30

जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात धान पऱ्हे टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र आतापर्यंत रोवणीच्या कामाने वेग घेतलेला नाही. जवळपास २५ हेक्टर इतकीच धान रोवणी होऊ शकली. यंदाच्या खरीप हंगामात तब्बल ७ हजार ३२० हेक्टर क्षेत्रावर आवत्या स्वरूपात पेरणी करण्यात आली आहे. रविवारपर्यंत धान रोवणीची टक्केवारी १० टक्क्यांवर पोहोचली.

Peak sowing reached 10 percent | पीक पेरणी १० टक्क्यांवर पोहोचली

पीक पेरणी १० टक्क्यांवर पोहोचली

googlenewsNext
ठळक मुद्देकेवळ २५ हेक्टरवर धान रोवणी : जिल्हाभरात ७ हजार ३२० हेक्टर क्षेत्रावर आवत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात धान पऱ्हे टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र आतापर्यंत रोवणीच्या कामाने वेग घेतलेला नाही. जवळपास २५ हेक्टर इतकीच धान रोवणी होऊ शकली. यंदाच्या खरीप हंगामात तब्बल ७ हजार ३२० हेक्टर क्षेत्रावर आवत्या स्वरूपात पेरणी करण्यात आली आहे. रविवारपर्यंत धान रोवणीची टक्केवारी १० टक्क्यांवर पोहोचली.
गडचिरोली जिल्ह्यात धान व इतर सर्व पिकांची मिळून एकूण १ लाख ५३ हजार २२८ इतके खरीप हंगामातील पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. यापैकी ५ हजार ८७८ इतके भात नर्सरीचे एकूण क्षेत्र आहे. धानोरा, गडचिरोली, कुरखेडा व कोरची आदी तालुके मिळून रोवणी केवळ २५ हेक्टरवर झाली आहे. सर्व पिकांची मिळून एकूण १० टक्के पेरणी झाली आहे. मृग नक्षत्रात शेतकऱ्यांना अपेक्षीत पाऊस झाला नाही. दोन ते तीन दिवस झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकºयांनी धान पऱ्हे टाकण्याचे काम लगबगीने आटोपले. अनेक शेतकऱ्यांनी आवत्या स्वरूपातील पेरणीही पूर्ण केली. आद्रा नक्षत्राच्या पावसामुळे शेतजमिनीतील पºह्यांना अंकूर फुटले. मात्र त्यानंतर जोरदार पाऊस बरसला नाही. अनेक ठिकाणचे पऱ्हे रोवणीयोग्य झाले असले तरी पाऊस नसल्याने बºयाच शेतकऱ्यांनी रोवणीच्या कामास अद्यापही प्रारंभ केला नाही. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनीत नांगरणी व वखरणी तसेच इतर कामे पूर्ण करून रोवणीचे काम सुरू करण्याच्या प्रतीक्षेत आहे. येत्या तीन-चार दिवसांत जोरदार पाऊस झाल्यास अर्ध्याअधिक जिल्ह्यात रोवणीच्या कामास धडाक्यात सुरूवात होणार आहे. सद्य:स्थितीत आरमोरी तालुक्याच्या वैरागड भागात उपलब्ध असलेल्या सिंचन सुविधेच्या भरवशावर काही शेतकºयांनी धान रोवणीचे काम हाती घेतले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सिंचन प्रकल्पाची अवस्था पाहिजे त्या प्रमाणात बळकट नाही. त्यामुळे येथील शेतकºयांना पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत १ हजार ६६१ हेक्टर क्षेत्रात मका पिकाची लागवड केली आहे. यामध्ये आरमोरी तालुक्यात पाच हेक्टर, कोरची तालुक्यात एक व चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक ४६ हेक्टर क्षेत्रावर मका पिकाचा समावेश आहे. ३१ हेक्टर क्षेत्रात इतर तृणधान्याची पेरणी करण्यात आली. ४ हजार ७४६ हेक्टर क्षेत्रावर तूर तर २३ हेक्टर क्षेत्रावर मूग व उडीद पिकाची लागवड करण्यात आली आहे. भूईमूग केवळ दोन हेक्टर क्षेत्रावर आहे. ३२० हेक्टर क्षेत्रावर तीळ तर ३ हजार ९१० हेक्टर क्षेत्रावर सोयाबिन पिकाची पेरणी करण्यात आली आहे.
दरवर्षी सूर्यफुलाची लागवड अनेक शेतकरी करीत होते. मात्र यंदा सूर्यफूल पिकाची लागवड झाली नसल्याचे कृषी विभागाच्या पेरणी अहवालावरून दिसून येत आहे.
धानोरात सर्वाधिक आवत्या
धान रोवणी व लागवडीचा खर्च परवडत नाही तसेच रोवणीसाठी मजुराची टंचाई भासत असल्याच्या कारणावरून बरेच शेतकरी आवत्या टाकतात. यंदाही काही शेतकºयांनी आवत्या स्वरूपात पेरणी केली आहे. विशेष म्हणजे, धानोरा तालुक्यात सर्वाधिक ३ हजार ६०३ हेक्टर क्षेत्रावर शेतकºयांनी आवत्या स्वरूपात धानाची पेरणी केली आहे. त्यानंतर आरमोरी तालुक्यात १ हजार ६४० हेक्टर, गडचिरोली तालुक्यात १ हजार ४९० तर कुरखेडा तालुक्यात ४११ हेक्टर क्षेत्रावर आवत्या आहे. कोरची व चामोर्शी तालुक्यातही काही शेतकऱ्यांनी आवत्या स्वरूपात धान पेरणी केली आहे.
२ हजार ८३ हेक्टर क्षेत्रावर कापूस
चामोर्शी, गडचिरोली व इतर तालुक्यात मिळून यंदाच्या खरीप हंगामात २ हजार ८३ हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये आरमोरी तालुक्यात सर्वाधिक २ हजार ४४ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड आहे.

Web Title: Peak sowing reached 10 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.