पावसामुळे भुईमुगाचा पेरा लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:43 AM2021-09-17T04:43:44+5:302021-09-17T04:43:44+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा, आरमोरी, धानोरा, वडसा, कोरची व अन्य तालुक्यांच्या काही भागात भुईमूग पिकाची लागवड केली जाते. आरमोरी तालुक्यातील ...
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा, आरमोरी, धानोरा, वडसा, कोरची व अन्य तालुक्यांच्या काही भागात भुईमूग पिकाची लागवड केली जाते. आरमोरी तालुक्यातील वैलोचना, गाढवी नदीकाठाचा व कुरखेडा तालुक्यातील खोब्रागडी, सती नदीचा किनारा लागवडीसाठी योग्य क्षेत्र असून या क्षेत्रात भुईमूग लागवडीचा पेरा वाढला आहे. या नद्यांचा किनारा भुसभुशीत असून पाण्याचा निचरा होणारी माती आहे. या पिकात कोणत्याही हवामानात जुळवून घेण्याची क्षमता असल्याने भुईमुगाचा पीक पेरा वाढला आहे.
भुईमूग उत्पादक शेतकरी बहुतेक पोळा सणानंतर भुईमूग पिकाच्या पेरणीसाठी बाह्य मशागतीला सुरुवात करतात. पण आता पोळा सण होऊन दहा-बारा दिवसांचा कालावधी लोटला आहे. पण पावसामुळे जमीन ओलीचिंब असल्याने बाह्य मशागतीच्या कामाला सुरुवात केली नाही. मशागतीला सुरूवात केली नसल्याने पेरणीची कामे लांबणीवर पडून याचा परिणाम उत्पादनावर हाेणार आहे.
160921\img_20201023_075604.jpg
फोटो... भुईमूग पीकासाठी बाह्य मशागत करताना