नियम माेडणाऱ्या दुकानांवर ठाेठावला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:25 AM2021-07-11T04:25:21+5:302021-07-11T04:25:21+5:30
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने निर्गमित केलेल्या सूचनेनुसार सोमवार ते शुक्रवारपर्यंत ४ वाजेपावेतो सर्व दुकाने, आस्थापना सुरू ठेवण्यास मोकळीक ...
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने निर्गमित केलेल्या सूचनेनुसार सोमवार ते शुक्रवारपर्यंत ४ वाजेपावेतो सर्व दुकाने, आस्थापना सुरू ठेवण्यास मोकळीक देण्यात आली आहे. शनिवार, रविवार हे दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने, दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत स्थानिक प्रशासनाकडून संबंधितांना वारंवार सूचना देऊनही नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे आढळल्याने पोलीस प्रशासन व नगर प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने धडक कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेत न माेडणारे मात्र शनिवारी सुरू असलेल्या १२ दुकानांवर दंडात्मक कारवाई केली, त्यांच्याकडून १३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. तसेच मास्कशिवाय फिरणाऱ्या ६ जणांकडून १२०० रुपयांचा दंड वसूल केला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक डाॅ. विशाल जयस्वाल व मुख्याधिकारी डाॅ. कुलभूषण रामटेके यांनी केले आहे.
100721\img_20210710_145801.jpg
कोरोना नियमांच्या अमंलबजावणी साठी स्थानिक प्रशासन सरसावले