पेन्शन योजना सात हजार लाभार्थ्यांवरच रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 06:00 AM2019-12-09T06:00:00+5:302019-12-09T06:00:16+5:30

असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांना सेवानिवृत्तीचे कोणतेही लाभ मिळत नाही. त्यामुळे वृध्दापकाळात त्यांची फार मोठी वाताहात होते. या वर्गाला पेन्शनचे संरक्षण मिळावे, या उद्देशाने केंद्र शासनाने अटल पेन्शन योजना सुरू केली. सुरूवातीला योजनेचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार करण्यात आला. या योजनेचे लाभार्थी बनविण्यासाठी प्रत्येक बँकेला व विभागांना उद्दिष्ट देण्यात आले होते.

The pension scheme was kept on seven thousand beneficiaries | पेन्शन योजना सात हजार लाभार्थ्यांवरच रखडली

पेन्शन योजना सात हजार लाभार्थ्यांवरच रखडली

googlenewsNext
ठळक मुद्देप्रचार व प्रसिद्धीकडे दुर्लक्ष : असंघटित कामगारांसाठी योजना

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मोठा गाजावाजा करून केंद्र शासनाने २०१५ मध्ये अटल पेन्शन योजना सुरू केली. चार वर्षाच्या कालावधीत केवळ ७ हजार ५०० लाभार्थी झाले आहेत. या योजनेच्या प्रचार प्रसिध्दीकडे शासनासह प्रशासनानेही दुर्लक्ष केले असल्याने या योजनेचा विस्तार रखडला आहे.
असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांना सेवानिवृत्तीचे कोणतेही लाभ मिळत नाही. त्यामुळे वृध्दापकाळात त्यांची फार मोठी वाताहात होते. या वर्गाला पेन्शनचे संरक्षण मिळावे, या उद्देशाने केंद्र शासनाने अटल पेन्शन योजना सुरू केली. सुरूवातीला योजनेचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार करण्यात आला. या योजनेचे लाभार्थी बनविण्यासाठी प्रत्येक बँकेला व विभागांना उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यामुळे सुरूवातीला काही नागरिकांनी या योजनेचे लाभार्थी होण्यासाठी अर्ज केले. या योजने नंतर केंद्र शासनाने अनेक योजना आणल्या. त्या योजनांकडे प्रशासन व शासनाने लक्ष वेधले. मात्र या योजनेकडे दुर्लक्ष केले. परिणामी या योजनेचा विस्तार रखडला आहे.
लाभार्थ्याला काही रक्कम गुंतवायची आहे. त्याच्या गुंतवणुकीनुसार ६० वर्षांचे वय पूर्ण झाल्यानंतर पेन्शन मिळणार आहे. कमीत कमी १ हजार ते जास्तीत जास्त पाच हजार रुपये पेन्शन देण्याचा प्रावधान या योजनेत आहे. गडचिरोली जिल्ह्यात असंघटीत क्षेत्रात काम करणाºया नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या योजनेला चांगला प्रतिसाद मिळणे अपेक्षित होते. व्यक्तीला म्हातारपणातच खºया अर्थाने पैशाची गरज राहते. १८ ते ४० वयापर्यंतचे नागरिक या योजनेचे लाभार्थी बनू शकतात. वयानुसार वेगवेगळे गट पाडण्यात आले आहेत. त्यानुसार लाभार्थ्याला रक्कम भरायची आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ बँक खाते असणे गरजेचे आहे. त्याच्या बँक खात्यातूनच विम्याची राशी वजा होते. त्यामुळे विम्याचे हप्ते भरण्यासाठी अतिरिक्त श्रम करण्याची गरज नाही. मात्र त्या खात्यात योग्य रक्कम असणे आवश्यक आहे.

ग्रामीण बँकेचे सर्वाधिक लाभार्थी
सर्व राष्टÑीयकृत बँकांना विमा काढण्यासाठी उद्दिष्ट देण्यात आले होते. सुरूवातीच्या कालावधीत बँकांनी प्रत्येक बँक खातेदाराला विमा काढण्याबाबत सांगत होते. त्यामुळे सुरूवातीला या योजनेला चांगला प्रतिसाद नागरिकांनी दर्शविला. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखा ग्रामीण भागातच अधिक आहेत. या भागातील नागरिकांनी या योजनेला चांगला प्रतिसाद दर्शवित सुमारे ४ हजार नागरिकांनी विमा काढला. इतर बँकांचे लाभार्थी मात्र ११०० पेक्षा कमीच आहेत.

Web Title: The pension scheme was kept on seven thousand beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.