जिल्ह्यातील १५० शाळांवर आता मानधनावरील शिपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:36 AM2021-03-10T04:36:34+5:302021-03-10T04:36:34+5:30
शाळांमधील नाईक, पहारेकरी, रात्रीचा पहारेकरी, सफाई कामगार, हमाल, परिचर, चाैकीदार, प्रयाेगशाळा परिसर या पदावरील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर ही पदे ...
शाळांमधील नाईक, पहारेकरी, रात्रीचा पहारेकरी, सफाई कामगार, हमाल, परिचर, चाैकीदार, प्रयाेगशाळा परिसर या पदावरील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर ही पदे संपुष्टात येतील, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शाळेत किती विद्यार्थीसंख्या आहे त्यानुसार किती शिपाई ठेवायचे हे ठरेल. शहरानुसार व ग्रामीण भागानुसार वेगवेगळा भत्ता दिला जाईल, याचे निर्देशही देण्यात आले आहे. ज्या शाळांमध्ये सद्यस्थितीत एकही चतुर्थश्रेणी पद कार्यरत नाही तेथे हा आकृतिबंद लागू असणार आहे. तर जेथे कर्मचारी कार्यरत आहेत, तिथे रिक्त असलेल्या पदांच्या प्रमाणात शिपाई भत्ता लागू राहणार आहे. शासनाच्या या नव्या आकृतिबंधामुळे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
बाॅक्स
जिल्ह्यातील माध्यमिक अनुदानित शाळा २९५
एकूण पदे ६७०
सद्या नाेकरीवर असलेले शिपाई ५२०
शिपायांच्या रिक्त जागा १५०
काेट
शासन निर्देशाप्रमाणे कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र याबाबत सध्या एकही शाळेचा प्रस्ताव आलेला नाही. काेणत्या शाळांमध्ये किती शिपाई आहेत, याबाबतची माहिती शाळांकडून मागविण्यात आली आहे. शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे संबंधित संस्थेच्या वतीने शाळास्तरावर मानधन तत्त्वावरील शिपाई ठेवण्यात येणार आहे.
- आर. पी. निकम, शिक्षणाधिकारी माध्य. गडचिराेली
अनेक वर्षांपासून शिपायांचे पद भरण्यात आले नाही. त्यामुळे शाळा कशी चालवायची हा प्रश्न आहे. या प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष हाेत आहे. अत्यल्प मानधनावर काेण काम करणार असा प्रश्न निर्माण हाेत असून या शासन निर्णयाच्या विराेधात कर्मचारी संघटनांनी एक दिवस शाळा बंद ठेवल्या हाेत्या. मात्र शासनाकडून या संदर्भात काेणतीही उपाययाेजना करण्यात आलेल्या नाहीत.
- राजेंद्र लांजेकर, अध्यक्ष रिसर्च संस्था तथा कार्याध्यक्ष गडचिराेली जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघ
खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील चतुर्थ कर्मचाऱ्यांसाठी आकृतिबंध लागू करण्याबाबतचा शासन निर्णय हा अन्यायकारक आहे. आकृतिबंध समितीने सुचविलेल्या सूचनांच्या पूर्णपणे विराेधात असलेला हा जीआर आहे. या निर्णयाचा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विराेध केला आहे. शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी आहे.
- टी. के. बाेरकर, उपाध्यक्ष गडचिराेली जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघ
बाॅक्स
शाळांमधील ही कामे काेण करणार
शाळांमधील प्रशासकीय कामांसाठी बाहेर फिरणे, शाळेची साफसफाई करणे, प्रयाेगशाळेतील गाेष्टींकडे लक्ष देणे, शिवाय शाळा दाेन सत्रात भरत असल्यास केवळ तीन शिपाई कुठे आणि कसे काम पाहतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नियमित वेतनावर असलेल्या शिपायांची पदे हद्दपार करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याने आता शाळांमधील ही कामे काेण करणार, असा प्रश्न निर्माण हाेत आहे.