दिव्यांगांनी शैक्षणिक साहित्य वापरावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:40 AM2021-09-22T04:40:31+5:302021-09-22T04:40:31+5:30
समग्र शिक्षा, जिल्हा परिषद गडचिरोली व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने गट साधन केंद्र आरमोरी ...
समग्र शिक्षा, जिल्हा परिषद गडचिरोली व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली यांच्या
संयुक्त विद्यमाने गट साधन केंद्र आरमोरी येथे दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा विकास साधण्याकरिता साहित्य निश्चितीकरण, मोजमाप व कॅलिपर फिटमेंट शिबिराचे आयोजन दिनांक १९ सप्टेंबर राेजी करण्यात आले होते. त्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक म्हणून गटशिक्षणाधिकारी बोलत होते.
या वेळी मार्गदर्शक म्हणून गटसमन्वयक कैलास टेंभुर्णे, जिल्हा समन्वयक संजय
नांदेकर, भाऊराव हुकरे, अविनाश पिपंळशेंडे, मुंबई येथील ॲलिम्को टीम व एन. आरएचएम व आरबीएसके टीम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
शिबिरामध्ये ५५ दिव्यांग विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. प्रत्येक दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता मोजमाप
करुन साहित्य निश्चित करण्यात आले. यात व्हिलचेअर, रोलेटर, कॅलीपर, ADL किट, MSIED किट व श्रवणयंत्र या साहित्यांचा समावेश आहे. या शिबिराकरिता पालकांनी समाधान व्यक्त केले.