गडचिरोलीवासीयांनो, आबांसारखी वेळ तुमच्यावर येऊ देऊ नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:44 AM2017-12-17T00:44:28+5:302017-12-17T00:44:43+5:30

हवेहवेसे वाटणारे आर.आर. पाटील ऊर्फ आबा हे तंबाखूसारख्या व्यसनामुळे आपणा सर्वांना सोडून गेले. नि:स्वार्थी, निष्कलंक आबांना संपूर्ण महाराष्टÑ पोरका झाला.

People of Gadchiroli, do not let time like you! | गडचिरोलीवासीयांनो, आबांसारखी वेळ तुमच्यावर येऊ देऊ नका!

गडचिरोलीवासीयांनो, आबांसारखी वेळ तुमच्यावर येऊ देऊ नका!

Next
ठळक मुद्देआर.आर. पाटील यांच्या कन्येने घातली साद : व्यसनमुक्तीवर स्मिता पाटील यांचे व्याख्यान; आबांच्या आठवणींना उजाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : हवेहवेसे वाटणारे आर.आर. पाटील ऊर्फ आबा हे तंबाखूसारख्या व्यसनामुळे आपणा सर्वांना सोडून गेले. नि:स्वार्थी, निष्कलंक आबांना संपूर्ण महाराष्टÑ पोरका झाला. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्टÑातील दारू व तंबाखू व्यसनांचा विळखा नष्ट होणे गरजेचे आहे. व्यसनांवर पैसे खर्च करू नका, असे सांगत, गडचिरोलीकरांनी अशा प्रकारचे व्यसन सोडून जिल्हा तंबाखू व व्यसनमुक्त करावा, असे आवाहन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री स्व.आर.आर. पाटील यांची कन्या तथा राष्टÑवादी युवती काँग्रेसच्या महाराष्टÑ प्रदेशाध्यक्ष स्मिता पाटील यांनी केले.
मुक्तिपथ गडचिरोलीच्या वतीने शनिवारी येथील गोंडवाना कलादालनात व्यसनमुक्तीवर आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. याप्रसंगी मंचावर स्व.आर.आर. पाटील यांच्या पत्नी आ. सुमन पाटील, सर्चचे संचालक डॉ. अभय बंग उपस्थित होते. पुढे बोलताना स्मिता पाटील म्हणाल्या, आबांना समाजकारणाची प्रचंड आवड होती. आबांनी गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी त्यांनी स्वत:हून पालकमंत्रीपद स्वीकारले. गडचिरोलीतील समस्या, जीवनशैली, येथील लोक, त्यांचा स्वभाव याबाबत आबा नेहमीच आम्हाला घरी सांगत होते. प्रेमळ स्वभावाचे असलेल्या गडचिरोलीतील लोकांविषयी काहीतरी चांगले करण्याची तळमळ त्यांच्या बोलण्यातून नेहमीच जाणवत होती. आबांनी गडचिरोलीतील मुलांना पुण्यात शिक्षण घेण्यासाठी ठेवले. यातील काही मुले नोकरीवर लागले तर काही चांगल्या दर्जाचे शिक्षण घेत आहे. कर्तृत्वाने ‘आबा’ गडचिरोलीकरांचे ‘मायबाप’ झाले. डान्सबार, दारूबंदी यासारखे कठोर निर्णय आबांनी आपल्या कार्यकाळात घेतले. महाराष्टÑाच्या मंत्रीमंडळात आबांनी आपले विकासत्मक कार्य व तळमळीने छाप सोडली. अशा आबांनी रुग्णालयात तीन महिने आजाराशी झुंज दिली व ते आम्हा सर्वांना सोडून गेले. आबांना आता आपण परत आणू शकत नाही. आबांसारखी वेळ तुम्ही स्वत:वर येऊ देऊ नका, अशी भावनिक साद त्यांनी यावेळी घातली.
महिला रुग्णालय सुरू न झाल्याची खंत
सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांना औषधोपचार मिळावा, या हेतूने पालकमंत्री असताना आर.आर. पाटील यांनी गडचिरोलीत महिला रुग्णालयास मंजुरी प्रदान केली. महत्प्रयासाने आणलेल्या या रुग्णालयाची इमारतही उभी झाली. मात्र तीन वर्ष उलटूनही हे रुग्णालय सुरू होऊ शकले नाही, अशी खंत स्मिता पाटील यांनी व्यक्त केली.

Web Title: People of Gadchiroli, do not let time like you!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.