गडचिरोलीकरांचे पुराच्या पाण्यातून धोकादायक मार्गक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 12:05 PM2019-09-07T12:05:56+5:302019-09-07T12:06:23+5:30

गडचिरोलीत नाल्यांवर असलेल्या ठेंगण्या पुलांवरून पुराचे पाणी वाहात असल्याने अनेक नागरिक पुराच्या वाहत्या पाण्यातून वाट काढत पैलतीर गाठण्याची धोकादायक कसरत करत आहेत.

People travel through flood waters in Gadchiroli district | गडचिरोलीकरांचे पुराच्या पाण्यातून धोकादायक मार्गक्रमण

गडचिरोलीकरांचे पुराच्या पाण्यातून धोकादायक मार्गक्रमण

Next
ठळक मुद्देपुरामुळे घरी बसता येत नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: सततच्या पावसाने नद्यांसह जंगलातून वाहणारे सर्व नाले तुडूंब भरून वाहात आहेत. या नाल्यांवर असलेल्या ठेंगण्या पुलांवरून पुराचे पाणी वाहात असल्याने अनेक नागरिक पुराच्या वाहत्या पाण्यातून वाट काढत पैलतीर गाठण्याची धोकादायक कसरत करत आहेत. अशाच प्रकारातून शुक्रवारी (दि.6) दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोघे जण वाहून गेले. मात्र तरीही हा धोका पत्करणे थांबलेले नाही. पुरामुळे घरी बसून राहिले तर उपाशी मरायचे का? असा त्या नागरिकांचा सवाल आहे.
सिरोंचा तालुक्यातील झिंगानूरपासून 12 किमी अंतरावर असलेला कोरेतोगू नाला 50 मीटर रुंद आहे. थोडा जास्त पाऊस झाला की त्यावरील रपट्यावरून 3 फूट वर पाणी वाहते. यामुळे 30 गावांच्या संपर्क तुटत आहे. सर्वजनिक बांधकाम विभागाकडे उंच पुल बांधण्यासाठी ग्रामपंचायतींनी वारंवार ठराव देऊन सुद्धा उंच पुलाच्या बांधकामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. यावरून आदिवासी भागातील सोयीसुविधांच्या बाबतीत शासन-प्रशासन खरच गंभीर आहे का? असा प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत.

Web Title: People travel through flood waters in Gadchiroli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर