१७ हजार २०८ रूपयांची पेप्सी केली नष्ट
By Admin | Published: March 11, 2016 02:08 AM2016-03-11T02:08:02+5:302016-03-11T02:08:02+5:30
देसाईगंज येथील कन्नमवार वार्ड सिंधी कॉलनी येथील रसना पेप्सीचे मालक महेश सचदेव यांच्या येथे बुधवारी सायंकाळी ७ ते ११ वाजताच्या सुमारास अन्न, औषध प्रशासन विभाग
देसाईगंजातील घटना : केमिकल मिसळवून केली होती भेसळ
देसाईगंज : देसाईगंज येथील कन्नमवार वार्ड सिंधी कॉलनी येथील रसना पेप्सीचे मालक महेश सचदेव यांच्या येथे बुधवारी सायंकाळी ७ ते ११ वाजताच्या सुमारास अन्न, औषध प्रशासन विभाग गडचिरोलीच्या पथकाने धाड घालून १७ हजार २०८ पेप्सी नष्ट केली आहे. येथे सहा नमुने अन्न, औषध प्रशासन विभागाने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहे.
महेश सचदेव हे लहान मुले चाखून खातात अशी रसना पेप्सी तयार करीत. या पेप्सीमध्ये कृत्रिम गोडी निर्माण करण्यासाठी त्यांनी सॅकरीन हे केमिकल त्यात मिसळविले होते. अन्न, औषध प्रशासन विभागाने ७ हजार १७० रूपये किमतीच्या १७ हजार २०८ पेप्सी तपासल्या. यात केमिकल्स आढळून आल्याने त्या रात्री ११ वाजता नष्ट करण्यात आल्या. तसेच येथून ४०० ग्रॅम सॅकरीनही जप्त करण्यात आले. पेप्सीचे पाच नमुने व सॅकरीनचा एक नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती अन्न, औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सदर कारवाई सहायक आयुक्त अन्न, औषध प्रशासन केंबळकर यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात अन्न सुरक्षा अधिकारी महेश चहांदे व सहायक गोडे यांच्या पथकाने पार पाडली. प्रयोगशाळेतील नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहितीही विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)