शीतपेय विक्रीत परराज्याचा टक्का वाढतीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:33 AM2021-03-08T04:33:57+5:302021-03-08T04:33:57+5:30

आरमोरी शहरात गेल्या अनेक वर्षांपासून उत्तरप्रदेशातील कानपूर, राजस्थान व इतर प्रदेशातील लोक दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला येऊन शहरातील जुना ...

Percentage increase in soft drink sales | शीतपेय विक्रीत परराज्याचा टक्का वाढतीवर

शीतपेय विक्रीत परराज्याचा टक्का वाढतीवर

Next

आरमोरी शहरात गेल्या अनेक वर्षांपासून उत्तरप्रदेशातील कानपूर, राजस्थान व इतर प्रदेशातील लोक दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला येऊन शहरातील जुना बसस्थानक व इतर महत्त्वाच्या ठिकाणी लस्सी व थंड पेयाचा व्यवसाय टाकून लस्सी, कुल्फी आईस्क्रीम व इतर थंड पेय व खाण्याचे पदार्थ विकत असतात. मोक्याच्या ठिकाणी भाड्याने जागा घेऊन ते चार महिने धंदा करतात. त्यांच्या दुकानात काम करणारी माणसेसुद्धा स्थानिकच आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून धंदा करीत असल्याने त्यांच्या शहरात ओळखी पण वाढल्या आहेत. त्यांच्या लस्सीला मोठ्या प्रमाणात मागणीसुद्धा आहे. शिवाय दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांसोबत ते प्रेमाने बोलतात व आदराने वागतात. या स्वभावामुळे ग्राहक त्यांच्याकडे आकर्षित हाेतात. त्यांच्याकडून मिळणारी सेवाही चांगली असते. त्यामुळेच स्थानिकांना त्यांच्या चवदार लस्सीची भुरळ पडते. दुसऱ्यांदा ग्राहकांची पावले आपसूकच त्यांच्या दुकानात वळत असतात. मार्च, एप्रिल, मे व जून, या चार महिन्यात त्यांचा व्यवसाय जाेमात चालताे. वर्षभराची कमाई ते चार महिन्यात करतात. पावसाळा सुरू झाला की पुन्हा आपल्या राज्यात परत जातात. मात्र ही किमया स्थानिकांना करता आली नाही. त्यांच्यात हा व्यवसाय करण्याची आवड नाही. त्यामुळे लस्सीच्या व्यवसायात स्थानिक माणूस मागे पडला आहे.

उत्तरप्रदेश व राजस्थानमधील लोक हे आपल्या शहरात येऊन लस्सी व थंड पेयाचा धंदा करून जातात मात्र स्थानिक माणूस उत्तरप्रदेश व राजस्थानमध्ये जाऊन व्यवसाय करणे तर सोडाच तो आपल्या गावातसुद्धा व्यवसाय करू शकत नाही. ही वास्तविकता आहे. हंगामी व्यवसाय करण्यासाठी हजारो किमीचे अंतर कापून आपल्या कुटुंबापासून कोसो दूर राहून व्यवसायाच्या निमित्ताने दुसऱ्या प्रदेशात जाऊन धंदा करणे हे सोपे काम नाही. त्याच्या हिमतीला व कर्तबगारीला दाद द्यावी तेवढी कमीच आहे. चिकाटी व व्यावसायिक दृष्टिकोनामुळे ते व्यवसायात पुढे गेले आहेत. चार महिन्याच्या या व्यवसायावर त्यांच्या कुटुंबाचे वर्षभराचे बजेट अवलंबून असताे.

उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात व्यावसायिक स्पर्धा आहे. परंतु गडचिराेली जिल्ह्यात व्यावसायिक स्पर्धा नाही.

बाॅक्स

माेक्याच्या जागेवर व्यवसाय

परराज्यातील अनेक व्यावसायिकांनी व्यवसाच्या दृष्टीने माेक्याच्या ठिकाणी जागा घेऊन घरेही बांधली आहेत. याचे कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. दरवर्षी उन्हाळ्यात चार महिने व्यवसाय करायचा असतो. त्यासाठी पुढच्या वर्षातील जागेचे भाडे आदल्याच वर्षी देऊन दरवर्षीची मोक्याची जागा ते बुक करतात. परंतु दिवसेंदिवस परिस्थिती बदलत असते. भविष्यात कदाचित मोक्याची जागा मिळाली नाही तर व्यवसायावर परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी जागा खरेदी करून घरेही बांधली आहेत. एवढ्या व्यावसायिक दूरदृष्टीने ते काम करतात. सकाळपासून रात्री अकरा वाजतापर्यंत सतत दुकाने सुरू ठेवतात. दरवर्षी तेजीत चालणारा हा व्यवसाय मागील वर्षी मात्र, कोरोना लााॅकडाऊनमुळे ताेट्यात गेला.

Web Title: Percentage increase in soft drink sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.