पर्यटनातून कायमस्वरूपी रोजगाराचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 01:14 AM2019-01-28T01:14:53+5:302019-01-28T01:16:13+5:30

जिल्ह्यातील शेतकरी आता दोन हंगामी शेतीकडे वळत आहेत. धानासोबत कापसाचा पेरा वाढत आहे. यासोबत जिल्ह्यात पर्यटन विकासातून कायमस्वरूपी रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वन, आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिली.

Permanent employment effort from tourism | पर्यटनातून कायमस्वरूपी रोजगाराचा प्रयत्न

पर्यटनातून कायमस्वरूपी रोजगाराचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांची ग्वाही : विविध क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा गौरव, पोलीस मुख्यालयात ध्वजारोहण

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकरी आता दोन हंगामी शेतीकडे वळत आहेत. धानासोबत कापसाचा पेरा वाढत आहे. यासोबत जिल्ह्यात पर्यटन विकासातून कायमस्वरूपी रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वन, आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिली.
येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानांवर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा शनिवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री आत्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यानंतर पोलिस दल तसेच गृहरक्षक दल यांची सलामी त्यांनी स्विकारली. याप्रसंगी जि.प. अध्यक्ष योगिता भांडेकर, आमदार डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष योगिता पिपरे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे , जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदी उपस्थित होते.
सर्वाधिक पुरोगामी असणाºया आपल्या राज्याने देशात सातत्याने पहिले स्थान राखलेले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ, सबका विकास’ हे ध्येय समोर ठेवले. त्यांना अपेक्षित असणारा विकास प्रत्यक्षात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात मोठ्या प्रमाणावर काम झाले आहे, असे पालकमंत्री आत्राम म्हणाले. आम आदमीच्या विकासाच्या दृष्टीने गेल्या चार वर्षात गडचिरोली जिल्ह्यासाठी सर्वाधिक निधी मिळविण्यासोबतच विविध योजना राबविण्यात शासनाला यश आले आहे. यापुढील काळातही याची गती कायम राहील याकरिता शासन प्रयत्नशील राहील अशी ग्वाही याप्रसंगी त्यांनी दिली.
आम आदमीच्या विकासाच्या उद्दीष्टाने गेल्या चार वर्षात गडचिरोली जिल्ह्यासाठी सर्वाधिक निधी मिळविण्यासोबतच विविध योजना राबविण्यात शासनाला यश आले आहे. आपला जिल्हा हा शेतीचा जिल्हा आहे. येथे सिंचन प्रकल्प कमी आहेत. यासाठी जलयुक्त शिवार तसेच मागेल त्याला शेततळे आणि धडक सिंचन विहीरी याला प्राधान्य दिले. यामुळे एक हंगामी शेतीचा हा गडचिरोली जिल्हा आता दोन हंगामी शेतीकडे वळला आहे. यावरुनच चार वर्षात झालेल्या विकासकामांचे यश आपणास दिसत आहे.
शेतकºयांना नुकसान झाल्याच्या स्थितीत त्यांना आधार मिळावा यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ आणून शेतकºयांचा सातबारा कोरा करण्यात आला. या पीक कर्ज माफीचा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील ३८ हजार २९९ शेतकºयांना झाला. या योजनेअंतर्गत कर्जमाफी आणि प्रोत्साहनापोटी या सर्वांना ११४ कोटी ११ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला. सोबतच खरिप हंगामासाठी नव्याने सुमारे १०५ कोटी रुपयांचे पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे असेही ते म्हणाले.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत अपघाती मृत्यू झालेल्या ७५ शेतकºयांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये मदत देण्यात आली आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.
धानाचा हंगाम संपल्यावरही शेतकºयांना उत्पन्न सुरु रहावे यासाठी मनरेगाच्या माध्यमातून काम उपलब्ध करुन देण्याचे काम शासन करीत आहे. यातून आतापर्यंत जिल्ह्यात साधारण ८३ कोटी रुपयांच्या खर्चाची कामे झाली आहेत, असे त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘सौभाग्य’ योजनेअंतर्गत जिल्ह्यात सध्या काम सुरु आहे. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून जिल्ह्याला चालू वर्षात २३४ कोटीहून अधिकचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षात या आदिवासी विकासाकरिता दिलेला एकूण निधी ११०० कोटींहून अधिक आहे, असे म्हणाले.
गडचिरोली जिल्ह्याची निवड आकांक्षित जिल्हा कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. विविध निर्देशांकावर आधारित कालबध्द कार्यक्रमात जिल्ह्यात विविध विभाग विकासाचे काम करीत आहे. यासाठी देखील ४३ कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याप्रसंगी आपत्ती व्यवस्थापन गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक भाषामध्ये आपत्ती व्यवस्थापना संबंधी जनजागृती विषयीची चित्रफीतचे अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन क्रिडा अधिकारी मदन टापरे व सैनिकी शाळेचे उपमुख्याध्यापक ओमप्रकाश संग्रामे यांनी केले. तर आभार निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे यांनी मानले.

पोलीस दलाच्या कामगिरीचे पालकमंत्र्यांनी केले कौतुक
आपल्या गडचिरोली जिल्ह्यात पोलीस दलाची भूमिका महत्वाची आहे. या वर्षभराच्या काळात पोलिस दलाची कामगिरी अत्यंत चांगली राहिली आहे. जिल्ह्यात वर्षभरात ५० माओवाद्यांचा खात्मा पोलिस दलाने केला. तसेच आत्मसमर्पण योजनेतून १८ जणांनी शरणागती पत्करली. पोलिस दलाच्या या कामगिरीबध्दल त्यांनी समाधान व्यक्त करून विभागाचे कौतुक केले. जिल्ह्यातील युवकांना पोलीस भरतीत सहभागी होणे शक्य व्हावे यासाठी खास बाब म्हणून जिल्ह्यातील युवकांनाच पात्र समजावे असे विशेष आदेश शासनाने जारी केला आहे, असे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी सांगितले.

पोलिसांसह अनेकांचा सत्कार
याप्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केलेल्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये पोलीस दलातील केंद्र शासनाकडून पराक्रम पदक पुरस्कारांनी राजु हनुमंत सिडाम, महेश गणुजी कुलेटी, गणेश मोहुर्ले, विजय चिंतामन टाल्टे, किरण बुचय्या दुर्गम, रमेश बोडका गावडे यांचा समावेश आहे. महसुल विभागातील मावा गडचिरोली स्पधेर्तील आंकाक्षित जिल्हा कक्षांतर्गत सिमा आटमांडे (कुरमाघर), प्राची मोहरकर (सुतक प्रथा), वर्षा वशिष्ट (सकस आहार), पुंडलीक काटकर (कृषी पुरक व्यवसाय), चंद्रशेखर गुरनूले (परसबाग), विजय दिगडे (गडचिरोली ब्रांड), मनिषा पोड (वनोपज) , अनिकेत सोनोने (स्वंयरोजगार) , सदानंद धुडसे (प्राथमिक शिक्षण), सारंग तरारे (शाळा व्यवस्थापन), राजू सोरते (आर्थिक समावेशन) यांचा यावेळी १० हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. तसेच भामरागड तालुक्यातील नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट कामगिरी केलेल्यांचा गौरव करण्यात आला.
४जि.प.विभागाकडून वनराई बंधारे बांधकाम उपक्रमांतर्गत तोडसा व जांभुळखेडा ग्रांमपंचायतींचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील सिकाई मार्शल आर्ट खेळात अनेक विक्रम करणारी एंजल देवकुले हिला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला असून तिचा सत्कार दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते झाला आहे. तसेच येथे सेजल गद्देवार, रजत सेलोकर , ईशा कोवासे, अंकित कन्नया, विकी पोदादी, सार्थक पुध्दटवार यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

इंद्रावती नदीवरील पुलाचे काम प्रगतीवर
जिल्ह्यात दळण वळण व्यवस्था उत्तम असावी यासाठी जिल्हा मार्गांना राष्ट्रीय महामार्ग म्हणून विस्तारीत करण्याचे काम देखील वेगाने सुरु आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे अहेरी तालुक्याच्या इंद्रावती नदीवर पूल उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. यानंतर आंतरराज्य संपर्क सोपा होणार आहे असे पालकमंत्री आत्राम यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात शिक्षण सुविधा वाढाव्यात यासाठी गोंडवाना विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठासाठी स्वतंत्र जागा असावी यासाठी शासनाने ८९ कोटींचा विशेष निधी दिला आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Permanent employment effort from tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.