सकारात्मक विचार व सढळ हाताने मदतीतूनच व्यक्तिमत्त्व घडते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:38 AM2021-07-30T04:38:14+5:302021-07-30T04:38:14+5:30
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा यांच्या अध्यक्षतेखाली शिबिर पार पडले. विशेष व्यक्ती म्हणून मानाने मिरवण्यासाठी प्रत्येकाने मन, बुद्धी व ...
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा यांच्या अध्यक्षतेखाली शिबिर पार पडले. विशेष व्यक्ती म्हणून मानाने मिरवण्यासाठी प्रत्येकाने मन, बुद्धी व शरीर यांचा संतुलित विकास करणे आवश्यक असते. त्यातूनच व्यक्तिमत्त्वविकास घडून येतो, असे प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा यांनी सांगितले.
प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी डॉ. विठ्ठल चव्हाण यांनी केले. संचालन डॉ. हितेंद्र धोटे यांनी केले, तर आभार डॉ. राजू चावके यांनी मानले. यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
(बॉक्स)
स्पर्धात्मक उपक्रमांवर भर द्या
यावेळी बोलताना डॉ. देव म्हणाले, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक उपक्रमात अधिकाधिक प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. त्याकरिता विद्यापीठ इंद्रधनुष्य, आविष्कार व युवा महोत्सव यासारख्या स्पर्धात्मक उपक्रमांचे दरवर्षी नियमितपणे आयोजन करीत असते, त्यात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी महाविद्यालय स्तरावरही असे उपक्रम आयोजित करण्याचे आवाहन डॉ. देव यांनी केले.