विमानाच्या इंधनापेक्षाही पेट्राेल महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:34 AM2021-08-01T04:34:09+5:302021-08-01T04:34:09+5:30
पेट्राेल व डिझेलचे दर रोज सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत असताना चैनीच्या वाहतुकीसाठी वापरले जाणारे विमानाचे इंधन चाळीस टक्क्यांनी स्वस्त आहे. ...
पेट्राेल व डिझेलचे दर रोज सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत असताना चैनीच्या वाहतुकीसाठी वापरले जाणारे विमानाचे इंधन चाळीस टक्क्यांनी स्वस्त आहे. पेट्रोल-डिझेलवर लावले जाणारे विविध कर विमानाच्या इंधनावर लावले जात नाहीत. त्यामुळे विमानाचे इंधन ट्रकसारख्या वाहनांसाठी लागणाऱ्या डिझेलच्या किमतीपेक्षा स्वस्त आहे.
गडचिराेलीत पेट्रोलचा भाव प्रतिलीटर १०८.५० रुपये, तर डिझेलचा भाव प्रतिलीटर ९६.६६ रुपयांच्या घरात आहे. विमानासाठी लागणाऱ्या एटीएफ इंधनाचा भाव मात्र प्रतिलीटर ६६.०६ रुपये आहे. विमानाला लागणाऱ्या इंधनावर केंद्र सरकारचे कर अत्यंत कमी आहेत. पेट्रोल आणि डिझेलवर लागू असलेला ‘सेस’ (उपकर) विमानाच्या इंधनावर नाही, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी लाेकमतला सांगितले.
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात आलेला कृषी अधिभारही विमानाच्या इंधनावर लावण्यात आलेला नाही. त्यामुळे डिझेलच्या प्रतिलीटर किमतीपेक्षा विमानाचे प्रतिलीटर इंधन सुमारे ४० टक्क्यांनी स्वस्त असल्याचे दिसून येते.
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
काेट
पगार कमी, खर्चात वाढ
काेराेनामुळे कंपनीची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. त्यामुळे काही कामगारांना कामावरून काढून टाकले आहे. काही माेजक्याच कामगारांना कामावर ठेवण्यात आले आहे. त्यातच मजुरीतही कपात केली आहे. पूर्वी दिवसाला ४०० रुपये मजुरी मिळत हाेती. आता केवळ ३५० रुपये दिले जातात. काेराेनाच्या कालावधीत महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ये-जा करण्याचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे जगावे कसे असा प्रश्न आहे.
संदीप डाेईजड, वाहनधारक
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
स्वत:च्या वाहनामुळे प्रवासाचा खर्च वाढला
पूर्वी बहुतांश नागरिक सार्वजनिक वाहनांचाच वापर करीत हाेते. गडचिराेली शहरातील बहुतांश नागरिक विविध कामांसाठी नागपूर किंवा चंद्रपूर येथे जातात. काेराेनाच्या पूर्वी एसटी बस किंवा खासगी बसनेच जात हाेते. मात्र, आता या वाहनातून प्रवास केल्यास काेराेना संसर्गाची भीती असल्याने नागरिक स्वत:चे चारचाकी वाहन घेऊन जातात किंवा स्वतंत्र चारचाकी वाहन भाड्याने घेतात. एसटी बसने दाेन जणांना नागपूरला जाऊन परत येण्याचा खर्च केवळ एक हजार रुपये येते. आता स्वतंत्र वाहनासाठी पाच हजार रुपये माेजावे लागतात.
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
हा बघा फरक !(दर प्रतिलीटर)
विमानातील इंधनाचे (एटीएफ) दर- ६६.०६ रुपये लीटर
दैनंदिन वाहनातील पेट्राेलचे दर- १०८.५० रुपये लीटर
डिझेलचे दर- ९६.६६ रुपये लीटर
शहरातील पेट्राेल-६
दरराेज लागणारे पेट्राेल- ५० हजार लीटर
दुचाकी वाहने- २०१४५
चारचाकी वाहने- ५६२३